मुंबई, 26 ऑक्टोबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनिमित्त राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. सोशल मीडियावर लाईव्ह येऊन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, तसंच मागच्या तीन महिन्यांमध्ये सरकारने कोणकोणते निर्णय घेतले, या सगळ्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या नागरिकांना दिला. मुख्यमंत्र्यांच्या संवादामधील महत्त्वाचे मुद्दे हे प्रत्येकाच्या मनातलं सरकार, हे आपलं सरकार, हे सर्वसामान्यांचं सरकार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण 75 वर्षांवरच्या नागरिकांना एसटीने मोफत प्रवासाची योजना सुरू केली. 52 दिवसांमध्ये 1 कोटी नागरिकांनी याचा लाभ घेतला. दिवाळीनिमित्त आनंद शिधा 100 रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेतला. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना एनडीआरएफ मदतीच्या दुप्पट आणि दोन हेक्टरऐवजी 3 हेक्टर मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय 30 लाख शेतकऱ्यांना 4 हजार कोटींची मदत, निकषात न बसणाऱ्या सततच्या पावसामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनाही 755 कोटी रुपयांची मदत भुविकास बँकेतून कर्ज घेणाऱ्या 35 हजार शेतकऱ्यांना 950 कोटींची कर्जमाफी नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान, एकाच दिवशी 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी रुपये जमा केले. पोलीस भरतीला सुरूवात, 20 हजार पोलीस शिपायांची पदं भरायला सुरूवात राज्यातल्या वेगवेगळ्या विभागातल्या 75 हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू पोलिसांच्या घरांच्या किंमती 50 लाखांहून 15 लाखांवर आणल्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयं उभारण्याचा निर्णय, आरोग्यासाठी दुप्पट निधी नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचा शुभारंभ लवकरच
याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या पायाभूत सुविधा आणि वेगवेगळ्या योजनांचं काम कशापद्धतीने सुरू आहे, याबाबतही या लाईव्ह संवादातून जनतेला माहिती दिली.