JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांनी आमदारांना तातडीने बोलावलं, कारणही आलं समोर

मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांनी आमदारांना तातडीने बोलावलं, कारणही आलं समोर

महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास प्रत्येक दिवशीच नवीन ट्विस्ट येत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, त्यातच सरकारमधले आमदार, प्रवक्ते आणि मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास प्रत्येक दिवशीच नवीन ट्विस्ट येत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, त्यातच सरकारमधले आमदार, प्रवक्ते आणि मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. या वादग्रस्त वक्तव्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांमध्ये आमदार आणि प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य होत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे. आमदार आणि प्रवक्त्यांनी भविष्यात अशी वक्तव्य करू नयेत, तसंच बोलताना काळजी घ्यावी, असा सज्जड दम या बैठकीत दिला जाण्याची शक्यता आहे. आमदार आणि प्रवक्त्यांनी लगेच कोणत्याही मुद्द्यावर बोलू नये, असे आदेशही एकनाथ शिंदेंकडून आमदार आणि प्रवक्त्यांना दिले जाण्याची शक्यता आहे. सत्तारांच्या अडचणी वाढल्या; महिला आयोगाकडून गंभीर दखल, महासंचालकांना कारवाईच्या सूचना सत्तारांचा माफीनामा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनंही केली आणि सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. वाद वाढल्यानंतर अखेर अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे कान टोचले. अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले. त्यांनी तात्काळ अब्दुल सत्तार यांना फोन करुन माफी मागण्यास सांगितले. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी जाहिररीत्या माफी मागितली. …तर माफी मागतो, सुप्रिया सुळेंबद्दलच्या वादग्रस्त टीकेनंतर सत्तार नरमले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या