'माझा फोन रेकॉर्ड करण्याची हिंमत कशी झाली, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुम्ही आमचा फोन रेकॉर्ड कसा केला'
अमरावती, 07 सप्टेंबर : अमरावती जिल्ह्यातील गांधी नगर येथील लव्ह जिहाद प्रकरणावर खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जोरदार राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली आहे. आपला फोन रेकॉर्ड कसा केला, या मुद्यावरून नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गांधी नगर येथील एका हिंदू 19 वर्षे तरुणीचे अपहरण केले. मुलीने केलेल्या चॅटिंग वरून पोलिसांनी सोहेल शहा या संशयित आरोपीला राजापेठ पोलीस ठाण्यात आणले आहे. मात्र, अजूनही मुलीचा शोध न लागल्याने भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते आक्रमक होत पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना धारेवर धरलं.
‘आमच्याकडे असे काही विषय येत असले आणि जर आम्ही तुम्हाला फोन करत असताना फोन रेकॉर्ड होत असेल थू आहे तुमच्या डिपार्टमेंटवर. मी तुम्हाला सांगते. मी फोन केला तेव्हा माझा संपूर्ण फोन कॉल रेकॉर्ड केला आहे’, असं म्हणत नवनीत राणा यांनी पोलिसांना धारेवर धरलं. ‘माझा फोन रेकॉर्ड करण्याची हिंमत कशी झाली, मी दलित आहे म्हणून फोन रेकॉर्ड केला आहे का, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुम्ही आमचा फोन रेकॉर्ड कसा केला. पीएसआय आमचे फोन रेकॉर्ड कसे करतात, ठाकरे साहेब तुमचं आता अती झालं आहे, पोलिसांनी मी दादाशिवाय कधी बोलत नाही, तुम्ही माझा फोन कसा रेकॉर्ड केला, तुमची हिंमत कशी झाली’, असा जाबच नवनीत राणा यांनी विचारला. (दसऱ्या मेळाव्याला शिंदे गटाचा मोठा धमाका, शिवसेनेच्या खासदारासह आमदार लागले गळाला, ठाकरेंना धक्के पे धक्का) दरम्यान, अपहरण झालेल्या मुलीचा १ तासात शोध न लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेल्या १० दिवसातील हे लव्ह जिहाद चे ५ वे प्रकरण असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे. (Shivsena vs Shinde : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत शिंदे गटाची मोठी मागणी, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?) दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे नुकतेच लव्ह जिहादचे प्रकरण भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्यानंतर या तरुणीला सध्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. धारणी येथील या उच्चशिक्षित मुलीला नववी पास असणाऱ्या एका आंतरधर्मीय मुलाने चंद्रविला या बनावट विवाह मंडळात नेऊन काझीची बनावट सही करून विवाह लावला होता. खासदार बोंडे यांच्या तक्रारीनंतर या चंद्रविला विवाह मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अनिल बोंडे यांनी धारणी येथे दौरा केला असता या दौऱ्यात बोंडे यांनी धारनी येथील मुस्लिम समाजाच्या प्रमुख नेत्यांशी व धर्म गुरू, मस्जिद ट्रस्टचे प्रमुख यांच्याशी चर्चा केली तसेच मुला मुलींचे कौन्सिलिंग करावे आणि भविष्यात असे प्रकरण घडू नये व धर्मांतरण होऊ नये या संदर्भात एकमत झाले अशी माहिती अनिल बोंडे यांनी दिली.