आपला जीव धोक्यात घालून प्रेतावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. त्यामुळे नागरिकात संताप व्यक्त केल्या जात आहे.
यवतमाळ, 08 सप्टेंबर : राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. यवतमाळ (Yavatmal ) जिल्ह्यामध्ये पावसामुळे विदारक दृश्य समोर आले आहे. जिल्ह्याच्या माळकिन्ही गावात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह घेऊन नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली. आपला जीव धोक्यात घालून प्रेतावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. त्यामुळे नागरिकात संताप व्यक्त केल्या जात आहे. महागाव तालुक्यातील माळ किन्ही येथील अविनाश कलाने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह माळ किन्ही येथे आणला. मात्र दिवसभर पाऊस सुरू होता. अशातच अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेले धनशेड हे नाल्याच्या पैल तिरी आहे. शिवाय अंत्यसंस्कारासाठी इतरत्र जागा नाही. त्यामुळे नाल्याच्या पुरातून वाट काढत दहन शेडमध्ये अंत्य संस्कार करण्याची वेळ आली.
नातेवाईकांनी मृतदेह तिरडीवर बांधून खांद्यावर घेऊन एकमेकांच्या साह्याने नाल्याच्या पुरातून छातीपर्यंत असलेला पाण्यातून वाट काढत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. विकासाच्या नावावर उड्या मारून जनतेची दिशाभूल सुरू असल्याचं हे जिवंत उदाहरण आहे. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वीज पडून बैल ठार दरम्यान, यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील सावंगी इथं विज कोसळून ऐका शेतकऱ्याची बैल जोडी जागीच ठार झाली. यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले. बुधवारी दुपारच्या सुमारास सावंगी परिसरात विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस आला. त्या दरम्यान मधुकर बोबडे या शेतकऱ्याची बैलजोडी पिंपळाच्या झाडाला बांधून होती. त्याच वेळी झाडावर विज कोसळली त्यात बैल जोडी जागीच ठार झाली.