JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अमरावतीत भाजपच्या आमदार-खासदारात शीतयुद्ध, मतभेदांचं टोक कोणत्या दिशेला जाणार?

अमरावतीत भाजपच्या आमदार-खासदारात शीतयुद्ध, मतभेदांचं टोक कोणत्या दिशेला जाणार?

अमरावती शहरात भाजपचे आमदार आणि खासदार यांच्यात मतभेद असल्याचं चित्र आहे. त्यामुळे हे मतभेद पुढे कोणत्या टोकाला जातील, हे येणाऱ्या आगामी काळात नक्कीच उघड होईल.

जाहिरात

खासदार अनिल बोंडे आणि आमदार प्रवीण पोटे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 17 जुलै : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध पक्षांमधील मतभेद उघडपणे समोर येताना दिसत आहेत. शिवसेना पक्षात तर याच मतभेदांमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. फक्त शिवसेनेतच नाही तर काँग्रेस पक्षातही अंतर्गत कलह असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलहच्या फारश्या बातम्या अद्याप समोर आलेल्या नाहीयत. पण भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्या बंडाची चांगलीच अख्यायिका आहे. आता खडसेंनी भाजपचा हात सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं आहे. पण तरीही भाजपमध्ये काही ठिकाणी अंतर्गत मतभेद असल्याचं चित्र आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे अमरावती शहर. अमरावती शहरात भाजपचे आमदार आणि खासदार यांच्यात मतभेद असल्याचं चित्र आहे. त्यामुळे हे मतभेद पुढे कोणत्या टोकाला जातील, हे येणाऱ्या आगामी काळात नक्कीच उघड होईल. पण भाजपसाठी हे धोकादायकच आहे. कारण एका ठिणगीवरुन जंगलात वणवा पेटतो. हे तर राजकारण आहे. त्यामुळे राजकारणात घडणारी प्रत्यक्ष घटना ही भविष्यासाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे प्रत्येक घटनेकडे बारकाईने लक्ष ठेवलं जातं. ( गुजरात मॉडेल बुडालं, अख्खा रस्ता खचून मार्गावर पाण्याने भरलेलं तळचं; पावसाचा धक्कादायक Video ) अमरावती शहरात दोन दिवसांपासून महापालिकेच्यावतीने रस्त्यावरील अतिक्रमण करत असलेल्या दुकानांचे अतिक्रमण काढण्याची मोहिम सुरू आहे. मात्र महापालिका प्रशासन काल अतिक्रमण कारवाई करतेवेळी घटनास्थळी माजी राज्यमंत्री आणि भाजप आमदार प्रवीण पोटे दाखल झाले. त्यांनी मनपा अतिक्रमण कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. यावेळी त्यांची मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक बाचाबाची सुद्धा झाली. प्रवीण पोटे यांनी अतिक्रमण मोहिमेला विरोध केला. विशेष म्हणजे प्रवीण पोटे यांनी यावेळी भाजप खासदार अनिल बोंडे यांचं नाव घेतलं. बोंडेंनी अतिक्रमण काढायला लावले का? असा सवाल पोटेंनी केला. आमदार प्रवीण पोटे यांनी मनपाच्या कारवाईविरोधात प्रतिक्रिया देखील दिली. “अतिक्रमण वाढत असतांना मनपा झोपली होती अतिक्रमण काढण्यापूर्वी नोटीस दिल्या पाहिजे होत्या. दोन वर्ष कोरोनात गेले. यात व्यापाऱ्यांचे नुकसान झाले”, अशी भूमिका प्रवीण पोटे यांनी मांडली. दुसरीकडे भाजप नेते माजी मंत्री आणि खासदार अनिल बोंडे यांनी अतिक्रमण काढल्याबद्दल महानगरपालिकेचे आभार मानले. त्यांनी महापालिकेच्या कामांचे स्वागत केले. व्यापाऱ्यांनी अतिक्रमण मोहीमेला सहकार्य कराव, असे आवाहन अनिल बोंडे यांनी केले. एकंदरीत अतिक्रमण वरून भाजपाच्या दोन नेत्यात जुंपली असून दोन भिन्न मते भाजप नेत्यांमध्ये दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या