जळगाव, 13 मे: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मद्यविक्री बंदी, सोशल डिस्टन्सिंग, जमावबंदी हे सर्व नियम झुगारत भाजपचे नगरसेवक आणि पोलिस कर्मचाऱ्यांने चक्का वाळू तस्करांसोबत जामनेर शिवारात एका शेतात मद्यपार्टी केली होती. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील, पोलिस कर्मचारी विनोद चौधरी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा.. मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी: केवळ या जिल्ह्यातच सुरु होईल ॲानलाईन मद्यविक्री
काय आहे प्रकरण? भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील, पोलिस कर्मचारी विनोद चौधरी यांच्यासह काही वाळूतस्करांनी लॉकडॉऊनच्या काळात 21 एप्रिल रोजी जामनेर शिवारातील मोहाडी येथील दत्तात्रय दिनकर पाटील यांच्या शेतात ही पार्टी झाली. गैरमार्गाने मद्यसाठा मिळवून या बहाद्दरांनी शेतात ओली पार्टी रंगवली होती. या पार्टीत पोलिस कर्मचारी व वाळूमाफियादेखील सहभागी झाले होते. धक्कादायक म्हणजे बिअरसह महागड्या मद्याचे घोट घेत जुगाराचा डावही रंगला होता. सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी याविषयी पोलीस अधीक्षकांना तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. पोलीस अधीक्षकांनी ही चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, फोटो पुरावे देऊन महिनाभर होऊनही संबंधितांवर गुन्हे दाखल होत नसल्याने गुप्ता यांनी गृहविभाग, मुख्यमंत्री यांच्याकडे ईमेल ने तक्रार केली होती. त्यानंतर याप्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी गंभीर दखल घेतली. हेही वाचा.. अचानक घरात घुसलेल्या व्यक्तीने केलेले सपासप वार, महिलेने जागेवरच सोडला जीव आता भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील (वय-32, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा), मुख्यालयातील पोलिस कर्मचारी विनोद संतोष चौधरी, सुपडू मकडू सोनवणे (46, रा. बांभोरी), बाळू नामदेव चाटे (45, रा. मेहरूण), विठ्ठल भागवत पाटील (33, रा. अयोध्यानगर), शुभम कैलास सोनवणे (24, रा. मयूर कॉलनी), अबुलैस आफताब मिर्झा (32, रा.कासमवाडी), हर्षल जयदेव मावळे (31, रा.अयोध्यानगर), दत्तात्रय पाटील (32, रा. मोहाडी, ता.जामनेर) या नऊ जणांविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.