JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / मुलुंड, नाशिक ते थेट परभणीपर्यंत... संजय राठोडांविरोधात भाजप महिला मोर्चाचं आक्रमक आंदोलन, पाहा PHOTOS

मुलुंड, नाशिक ते थेट परभणीपर्यंत... संजय राठोडांविरोधात भाजप महिला मोर्चाचं आक्रमक आंदोलन, पाहा PHOTOS

पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) महाविकास आघाडीतील मंत्री संजय राठोड चांगलेच अडचणीत सापडले आहेत. भाजपने संजय राठोडांच्या राजीनाम्याची मागणी करत आज राज्यभरा आंदोलन केले. पाहा दिवसभरातील PHOTOS

0117

पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) महाविकास आघाडीतील मंत्री संजय राठोड चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विरोधकांनी याप्रकरणात महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे

जाहिरात
0217

या प्रकरणात भाजपचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. भाजप महिला मोर्चा या विषयावर विशेष आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्याकडून संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा शिवाय त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे

जाहिरात
0317

याच मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्या महिलांनी मुलुंड टोलनाक्यावर चक्का जाम आंदोलन केलं. महिलांच्या ठिय्यामुळे काही वेळासाठी रहदारीवर परिणाम देखील झाला होता

जाहिरात
0417

वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याशिवाय शांत राहणार नाही असा इशाराच या महिला मोर्चाकडून देण्यात आला आहे. मुलुंड टोलनाक्याजवळ हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळी पोहचून भाजपच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं

जाहिरात
0517

मुलुंड व्यतिरिक्त राज्यभरात संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं आहे. नवी मुंबई, यवतमाळ, वसई-विरार, औरंगाबाद, चेंबूर याठिकाणी देखील रस्त्यावर उतरून भाजपकडून आंदोलन करण्यात आलंय.

जाहिरात
0617

याशिवाय भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यांनी यावेळी पोलीस प्रशासन गुन्हेगाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.

जाहिरात
0717

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येस जबाबदार ठरवून पुण्यामध्ये भाजपच्या महिला आघाडीकडून कोथरुड पोलीस स्टेशनवर या मुद्द्यावरुन मोर्चा काढण्यात आला. तर बीडमध्ये संजय राठोड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले

जाहिरात
0817

वसई विरार मध्ये भाजप महिला मोर्चाकडून नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले. मंत्री संजय राठोड यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा महाविकास आघाडी सरकारने राजीनामा कबूल करावा,नाहीतर या पेक्षा तीव्र आंदोलन करू,असा इशारा भाजप महिला कार्यकर्त्यांनी दिला आहे

जाहिरात
0917

संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपाच्या वतीने वाशी टोल नाका,नवी मुंबई या ठिकाणी 'चक्का जाम आंदोलन' करण्यात आलं

जाहिरात
1017

वाशी टोलनाका

जाहिरात
1117

धुळ्यातही महिलांचा ठिय्या

जाहिरात
1217

परभणीतही संजय राठोडांचा निषेध

जाहिरात
1317

परभणी

जाहिरात
1417

संभाजीनगर: पोलिसांनी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात

जाहिरात
1517

संभाजीनगर: पोलिसांनी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात

जाहिरात
1617

नाशिकमध्येही चक्काजाम

जाहिरात
1717

नाशिक

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या