औरंगाबाद, 9 जुलै: राज्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव येथील परिस्थिती तर चिंताजनक आहे. दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना औरंगाबादेत मोठी घोषणा केली आहे. अँटी व्हायरल औषधी लवकरच राज्यात येणार आहे. आम्ही स्वतः वाट पाहत आहोत. सिपला कंपनीनं लवकर औषधी देण्याचे मान्य केल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली. हेही वाचा… औरंगाबाद घाटी रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात येणार आहे. 10 प्लाझ्मा थेरपीमधील 9 थेरपी यशवी ठरल्या आहेत, असंही टोपेंनी यावेळी सांगितलं. कोरोनाचा संसर्ग रोखणारे औषधी मुबलक पुरवठा करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. खासगी दवाखान्यात आव्वा ते सव्वा बिल आकारता येणार नाहीत. तसेच वरिष्ठ पदस्थ डॉक्टरांनी कोविड आयसीयूमध्ये प्रत्येक तासाला लक्ष घालावे, अशा सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. औरंगाबादेत शिवसेनेला धक्का…नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे शिवसेनेचे नेते नितीन साळवी यांचे निधन झालं आहे. त्यानंतर आता आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील पडेगाव परिसरातील नगरसेवक रावसाहेब आमले यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. बुधवारी पहाटे 4 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. रावसाहेब आमले यांच्यावर प्लाझ्मा थेरपी होणार होती. मात्र, थेरपी करण्याआधीच त्यांच्यावर मृत्यू ओढावला. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 101 तर ग्रामीण भागातील 65 रुग्णांचा समावेश आहे. हेही वाचा… औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7504 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 4033 रुग्ण बरे झाले आहेत. 330 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू तर सध्या 3141 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे.