पंढरपूर, 08 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg) आणि संत तुकाराम महाराज पालखी (Sant Tukaram Maharaj Palkhi Marg) मार्गाचा भूमिपूजन (Bhumi Pujan ceremony) सोहळा पार पडणार आहे. हा पालखी मार्ग वारकरी संप्रदायासाठी उभारण्यात येत आहे. आज ऑनलाईन माध्यमातून हा भूमिपूजन सोहळा पार पडेल. आज दुपारी साडे तीन वाजता हा भूमिपूजन सोहळा पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्याला उपस्थित राहतील. जवळपास 10 कोटींचा हा पालखी मार्ग आहे. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे.
कसा असेल हा पालखी मार्ग संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग हा पंढरपूर ते आळंदी असा असणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग देहू ते पंढरपूर असा हा मार्ग असेल. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (NH-965) पाच विभागांचे चौपदरीकरण, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (NH-965G) तीन विभागाचे चौपदरीकरण होणार आहे.
आषाढी वारीसाठी किंवा कार्तिकी एकादशीला आळंदी आणि देहू मधून लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर असतात. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गातून दोन्ही बाजूस पालखीकरिता समर्पित असे पदपथ बांधले जाणार आहेत. या महामार्गामुळे भाविकांना त्रासमुक्त आणि सुरक्षित असा रस्ता मिळणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दिवेघाट ते मोहोळ असा सुमारे 221 किलोमीटर, तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर पाटत ते तोंडळे-बोंडाळे असा सुमारे 130 किलोमीटरचे चौपदरीकरण आणि वारकऱ्यांसाठी पदपथाची निर्मिती केली जाईल. त्यासाठी अनुक्रमे 6 हजार 690 कोटी आणि 4 हजार 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार असल्याची माहिती मिळतेय.