नेहाल भुरे (भंडारा), 06 नोव्हेंबर : ॲमेझॉन कंपनीच्या साहित्य भरलेल्या कंटेनरमधून साहित्य चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या कंटेनरमध्ये जवळपास लाखो रुपयांचे किमतीचे साहित्य असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार कंटेनर चालक व वाहकाने संगनमत करून लंपास केल्याचे बोलले जात आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या राष्ट्रीय महामार्गावर लाखनी तालुक्यातील मानेगावजवळील पेट्रोल पंपाच्या जवळ घडली आहे.
साबीर युनुस खान (34), सलीम गफार खान (32, दोघे रा. कोट, जि. पलवन, हरियाणा) अशी आरोपींची नावे आहेत. भिंवडी (मुंबई) येथून ॲमेझॉन कंपनीचे साहित्य घेऊन कंटेनर (एचआर 38 एसी 4825) अर्जव इंडस्ट्रीयल वेअर हाऊस पार्क धानकुनी पश्चिम बंगाल जाण्यासाठी निघाला होता. यात 48 लाख 55 हजार 977 रुपयांचे विविध साहित्य होते. दरम्यान चोरट्यांनी मानेगावजवळील एका पेट्रोल पंपावर कंटेनर सोडून देत यातील साहित्य चोरले.
हे ही वाचा : वाळू तस्करांनी केला जीवे मारण्याचा प्रयत्न, बचावासाठी तहसीलदाराने बंदूक काढली अन्…, भंडाऱ्यातील थरार
चालक व क्लीनरने कंटेनरच्या मागील बाजूचे सील व कुलूप तोडून इलेक्ट्रॉनिक, ब्यूटी पार्लर, खेळणे तसेच इतर घरगुती असे 1 हजार 941 वस्तू चोरल्या. या वस्तूंची अंदाजे किमत 23 लाख 19 हजार 833 रुपये असल्याचे बोलले जात आहे. कंटेनर मालक मनोज विजय त्यागी (रा. फरिदाबाद, हरियाणा) यांनी लाखनी पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. त्यावरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
नागपूरमध्ये धाडसी चोरीचा प्रकार
नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी शांती नगर पोलीस स्टेशन हद्दीत 73 लाख रुपयांची चोरी झाली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. व्यसनाधीन असलेल्या एका 28 वर्षीय तरुणानेच ही चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. हे ही वाचा : टार्गेट पूर्ण न केल्यामुळे बॉसने कर्मचाऱ्याच्या डोक्यात फेकून मारलं घड्याळ; कर्मचाऱ्याने.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफर जावेद थारा असं अटकेतील तरुणाचं नाव आहे. तर वाजीद वल्द गफ्फुर अली असे सहकऱ्याचे नाव आहे. या दोघांना एकूण 13 लाख रुपये रोख आणि सोन्याच्या दागिन्यांसह 60 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. पोलिसांनी अखेर चौकशी अंती या दोघांकडून हा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या घटनेत मुलासह आणखी एका सहकऱ्याला अटक केली आहे. इलेक्ट्रॉनिक लोकर तोडणारा एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.