JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / STI Exam Result : बीडचा शुभम राज्यात पहिला, पाहा 4 वर्षांच्या परिश्रामानंतर कसं मिळलं यश? Video

STI Exam Result : बीडचा शुभम राज्यात पहिला, पाहा 4 वर्षांच्या परिश्रामानंतर कसं मिळलं यश? Video

तरुणानं फक्त परीक्षाच पास केली नाही तर राज्यात कर निरीक्षक म्हणून पहिला क्रमांक पटकवला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 22 नोव्हेंबर : सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. खरतड अशा परीक्षांना सामोरं जातात. यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं. बीड मधील एका तरुणानं देखील मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केलं आहे. या तरुणानं फक्त परीक्षाच पास केली नाही तर राज्यात कर निरीक्षक म्हणून पहिला क्रमांक पटकवला आहे.     महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या  2020 च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात बीडच्या शुभम प्रताप पाचंग्रीकर याला घवघवीत यश मिळालं आहे. एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. काही विद्यार्थ्यांना यश संपादन होते तर काही विद्यार्थ्यांना अनेकदा वर्षानुवर्ष मेहनत घ्यावी लागते. सरकारी नोकरी किंवा सरकारी अधिकारी व्हावे, अशी इच्छा अनेक तरुणांची असते. असा तरुणांसाठी शुभमची कहाणी प्रेरणादायी आहे. एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या एसआयटी परीक्षेचा निकाल लागला. यात शुभमला 306 मार्क मिळालं आहेत. या गुणांसह शुभमने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 2020 साली शुभमने ही परीक्षा दिली होती. शुभमच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सुरुवातीपासूनच शिक्षणात हुशार  शुभमचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे बीड येथील चंपावती माध्यमिक विद्यालय झाले. दहावीत शुभमने 94 टक्के गुण मिळवले. सुरुवातीपासूनच शिक्षणात हुशार असलेल्या शुभमने शिक्षणाचा एक एक टप्पा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केला. पुढं उच्चशिक्षणासाठी त्याने पुणे गाठले आणि इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशन इंजिनियरिंग मध्ये शिक्षण घेतलं. या शिक्षणावर त्यानं एका नामांकित कंपनीमध्ये एक वर्ष नोकरी देखील केली.   NDA Entrance : औरंगाबादच्या स्टेशनरी दुकानदाराची मुलगी देशात दुसरी! Video 2018 पासून एमपीएसी परिक्षेची तयारी दरम्यान, स्पर्धा परीक्षेची क्रेज पाहता आणि सरकारी नोकरदार व्हावे असे स्वप्न मनोमन बाळगून शुभमने 2018 पासून एमपीएसी परिक्षेची तयारी सुरू केली. चिकाटीने अभ्यास केला. आणि विक्रीकर निरीक्षक या पदासाठीची परीक्षा दिली. शुभमचे वडील प्रतापराव हे शासकीय निवृत्त कर्मचारी आहेत. वडीलांची शुभमने शासकीय नोकरदार व्हावे,अशी इच्छा होती. यासाठी त्यांनी वेळोवेळी शुभमला मार्गदर्शन केले. आता परीक्षेचा निकाल आला असून शुभमची विक्री कर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे.     विश्वासच बसत नव्हता निकाल लागल्याचे मला मित्रांकडून समजले. निकाल तर लागला पण आपण राज्यात पहिला क्रमांक मिळाला यावर विश्वासच बसत नव्हता. परंतु, गेल्या चार वर्षापासून प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे त्याचे हे फळ मिळालं असल्याचे शुभम सांगतो. इथून पुढेही अभ्यास सुरूच राहणार असून परीक्षांची तयारी करण्याचा मानस शुभमचा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या