JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Positive Story : तहानलेल्यांना देतोय 'हा' रिक्षाचालक निःस्वार्थ सेवा; न थकता, न दमता मागच्या तीन वर्षांपासून सुरुय हे काम

Positive Story : तहानलेल्यांना देतोय 'हा' रिक्षाचालक निःस्वार्थ सेवा; न थकता, न दमता मागच्या तीन वर्षांपासून सुरुय हे काम

मागील दोन वर्षात कोरोनाने (Corona Pandemic) सर्व जगात हाहाकार माजवला होता. त्यामध्येच अनेक गोरगरीब लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. मात्र, त्याकाळातही औटी यांनी आपल्या रिक्षाच्या मदतीने जिल्हा रुग्णालय परिसर, तसेच ज्या ज्या ठिकाणी कोविंड सेंटर (Covid Centre) आहेत त्या त्या ठिकाणी जात मोफत चहादेखील वाटला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 22 मे : मागच्या कित्येक दिवसांपासून मराठवाड्यात (Marathwada) उन्हाचा पारा तीव्र (Heat Wave) होतो आहे. यामुळे अनेक लोकांची उष्णतेने काहिली होत आहे. उन्हाच्या या तडाख्यात एक व्यक्ती चांगले कार्य करताना दिसत आहे. (Positive Story From Beed) काही लोक कामानिमित्त घराबाहेर पडतात आणि उन्हामुळे तहानलेले असतात. अशा लोकांना पाण्याची गरज असते. या लोकांना पाणी देण्याचे काम एक रिक्षाचालक करत आहे. (Rikshaw driver given water) मागच्या तीन वर्षांपासून ते हे काम करत आहेत. बीड शहरातील संतोष औटी एका रिक्षाचालकाने (Rikshaw driver) सामाजिक दायित्व म्हणून पुढाकार घेत हे कार्य सुरू केले आहे. शहरातील संतोष औटी हे रिक्षाचालक मागील तीन वर्षांपासून उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तींची तहान भागविण्याचे कार्य करत आहेत. (Water Distribution in Summer) औटी यांच्या कार्य तत्परतेने अनेकांना उन्हाच्या या तडाख्यात आधार मिळतोय. हे ही वाचा :  महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल, डिझेल आणि गॅसदरात मोठी कपात समाजासाठी काहीतरी करावं, ही भावना -  संतोष औटी मागील 25 वर्षांपासून रिक्षा चालवतात. मात्र, केवळ रिक्षा चालवून आपली उपजीविका भागवायची नाही. तर सामाजिक भान जपत समाजासाठी काहीतरी करावं, या भावनेतून ते निस्वार्थ सेवा देत आहेत. यांच्या या भावनेमुळे कित्येक लोकांची तहान भागत आहे. यामुळे त्यांच्याकडे पाणी घेणाऱ्या लोकांना एक वेगळे मानसिक समाधान मिळत आहे. संतोष औटी हे सकाळी सात वाजता आपल्या घरातून रिक्षा घेऊन बाहेर निघतात. त्यानंतर शहरातील प्रमुख भागात जाऊन थांबतात. यानंतर त्याठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची तहान भागवतात. हे ही वाचा :  Video : कॉलेजपासून 200 फुटावर ओढत नेत विद्यार्थिनीचा खून; औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार कोरोना काळातही दिली सेवा -  मागील दोन वर्षात कोरोनाने (Corona Pandemic) सर्व जगात हाहाकार माजवला होता. त्यामध्येच अनेक गोरगरीब लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. मात्र, त्याकाळातही औटी यांनी आपल्या रिक्षाच्या मदतीने जिल्हा रुग्णालय परिसर, तसेच ज्या ज्या ठिकाणी कोविंड सेंटर (Covid Centre) आहेत त्या त्या ठिकाणी जात मोफत चहादेखील वाटला होता. औटी यांच्या या सेवा भावाचे बीडच्या जनतेकडून कौतुक होताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या