बीड, 15 डिसेंबर : भारत देशात एकमेव असे भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात आहे. पौरााणिक अनमोल ठेवा असलेलं हे मंदिर आजही विकासापासून दूर आहे. देशभरातून येथे भक्त दर्शनासाठी येतात. मात्र, भक्तांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असल्याचं चित्र आहे. रस्ता, पाणी, लाईट, पार्किंग असा समस्यांचा सामना भक्तांना करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामध्ये पुरुषोत्तम भगवानचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार व परिसरातील कामांसाठी राज्य सरकारने 2021 साली 54 कोटी रुपयांचा निधी तीर्थ विकास क्षेत्रातून मंजूर करून दिला आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने मंदिराच्या विकासासाठी देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यासाठी 5 कोटी 56 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मंदिराला तीर्थ विकास क्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. मात्र, विकास कामाला सुरुवात झाली नाहीये. त्यामुळे मंदिर परिसरात अनेक समस्या जाणू लागल्या आहेत. परिसरातील विकास कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक भाऊसाहेब गोळेकर यांनी केली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये अधिक मासाला सुरुवात होते. या ठिकाणी मोठा यात्रा उत्सव भरतो. देशभरामधून भाविक भक्त पुरुषोत्तम भगवानाच्या दर्शनासाठी याठिकाणी येतात. मात्र मंदिर परिसरामध्ये अनेक दिवसांपासून विकास कामे रखडल्या असल्यामुळे भाविकांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत. मंदिर परिसरात समस्या देशातील एकमेव पुरुषोत्तमाचे मंदिर असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र, नॅशनल हायवे पासून ते मंदिरापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, भक्तांना राहण्यासाठी भक्तनिवास, कार पार्किंगची व्यवस्था नाही, 24 तास मंदिर परिसरात विद्युत पुरवठा नाही. Solapur : सिद्धेश्वर यात्रेचं काऊंटडाऊन सुरू, 1 कोटींचा रेडा ठरणार खास आकर्षण पुरातत्त्व विभागाची पाहणी सप्टेंबर 2022 मध्ये पुरातत्त्व विभाग दिल्ली, मुंबई, पुणे येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने मंदिराची पाहणी केलेली आहे या पाहणीनंतर दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटली आहे तरीही प्रत्यक्षात मंदिर व परिसरातील विकास कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही. ‘आपले सरकार’वर 6 हजार तक्रारींचा पाढा, ‘या’ समस्यांची संख्या सर्वाधिक Video लवकरच कामाला सुरुवात तीर्थ विकास क्षेत्रातून राज्य सरकारने पुरुषोत्तमाच्या मंदिरासाठी मोठी तरतूद केली. त्यामधील पहिल्या टप्प्यामध्ये पाच कोटी 56 हजार रुपयांचा निधी देखील वर्ग करण्यात आला आहे. येथील कामाला सुरूवात केली जाणार असल्याचे पुरुषोत्तम पुरी मंदिराचे अध्यक्ष विजय गोळेकर यांनी दिली.