बीड, 04 जानेवारी : संक्रांत सण अगदी काही दिवसांवर आला आहे. बीड मधील कुंभारवाड्यात तयार होणाऱ्या संक्रातीच्या मातीच्या सुगड्यांना जिल्ह्यातून मागणी असते. त्यामुळे सुगडी बनविण्याच्या कामाने वेग घेतला आहे. मात्र, कुंभाराच्या पारंपारिक व्यवसायाला वाढत्या महागाईची झळ बसली आहे. त्यात तयार वस्तूंना चांगला भाव मिळत नसल्याचे व्यावसायिक अडचणीत आहेत. मकर संक्रांतीचा सण आता काही दिवसांवर आला आहे. वाण देण्यासाठी महिलांना लागणारे सुगडे बनविण्याची सध्या बीड शहरातील कुंभार वाड्यात लगबग सुरू झाली आहे. ग्रामीण भागात सण उत्सवाला मोठे महत्त्व आहे. त्यात रूढी परंपरेचाही समावेश असतो. तिळगूळ घ्या गोड गोड बोला, असा संदेश देत समोरच्या प्रति प्रेम आपुलकी आदर व्यक्त करण्याची संधी मकर संक्रांतीच्या सणाच्या माध्यमातून आपल्याला मिळते. याच दिवशी सुवासिनी एकमेकांना वाण देतात. वाण देण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर केला जातो. त्यालाच सुगडे संबोधले जाते. कित्येक वर्षानुवर्ष ही रूढी परंपरा पिढी जात चालत आली आहे. महागाईचा फटका सध्या महागाईच्या काळामध्ये मातीचे सुगडे बनवणे कुंभाराला जड जात आहे. वाढत्या इंधनाचा भाव, मातीची कमतरता, लाकडाची दरवाढ यामुळे कुंभार साहित्य बनविणे महागडे झाले असून साहित्याला बाजारात मिळत असलेला भाव कमी आहे. कुंभाराने बनवलेल्या वस्तूला विक्रीसाठी अधिकृत जागा नाही. वस्तू विक्रीसाठी हात गाड्या घेऊन फेऱ्या माराव्या लागतात.
संक्रांतीच्या एक महिना आधीच सुगडे बनवायला कुंभारवाड्यात सुरुवात होते. कुंभारवाड्यातील अनेक परिवार वर्षानुवर्ष सुगडे बनवण्याचे काम करतात. वाढत्या महागाईमुळे सुगडे बनवावेत का नाही, असा प्रश्न कुंभारांच्या समोर उपस्थित झाला आहे. Makar Sankrant : हलव्याच्या दागिन्यांमध्ये यंदा काय आहे ट्रेन्डिंग? पाहा Video चांगला भाव मिळण्याची अपेक्षा जोड खणामध्ये एकूण 15 नग असतात. यामध्ये पाच मोठे सुगडे, झाकण, दोन पाट, पोट अशा एकूण 15 वस्तूचा समावेश असतो. गेल्यावर्षी जोड खानाला 50 ते 60 रुपये एवढा भाव होता. यावर्षी जोड खणाला 80 ते 90 रुपये भाव मिळावा अशी अपेक्षा कुंभार बांधव करत आहेत.