JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा पाहून धनंजय मुंडे संतापले, सरकारला दिला थेट इशारा, म्हणाले...

बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा पाहून धनंजय मुंडे संतापले, सरकारला दिला थेट इशारा, म्हणाले...

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या नशिबी आलेल्या या गंभीर परिस्थितीत सरकारने तातडीने मदत न केल्यास, रस्त्यावर उतरून आंदोलन करू

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 22 ऑक्टोबर : हे सरकार शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मात्र प्रशासन आणि सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे सरकारने आता तरी या शेतकऱ्यांना सरसकट दिवाळीपूर्वी मदत करावी. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा गंभीर आरोप आणि सणसणीत इशारा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. धनंजय मुंडे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बीड मधील शेतीची पाहणी केली. शुक्रवारी परळी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यानंतर मीडियाशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. (राज ठाकरेंच्या दीपोत्सवात महायुतीचे संकेत, निवडणुकींसाठी त्रिदेव एकत्र येणार?) आज परळी तालुक्यात अचानक वाढलेल्या अतिवृष्टीमुळे, शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झालंय. अनेक पुल वाहून गेलेत आणि याचीच पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे हे थेट शेताच्या बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी तहसीलदार यांना झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे तात्काळ सरकारला सादर व्हावेत. तसंच घरात पाणी शिरून ज्यांचे धान्य, किराणा, भांडे आदी संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे, अशा कुटुंबांना आकस्मिक निधीतून 6 हजारांची मदत करण्याची कार्यवाही 24 तासांच्या आत करावी, अशा सूचना केल्या आहेत.

‘मागील 15 दिवसात बीड जिल्ह्यात दररोज एक शेतकरी आत्महत्या होत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यात सरकारला अपयश आले आहे. मागील दोनवेळा मदतीची घोषणा केली तेव्हा बीड जिल्ह्याला त्यातून वगळले आहे. पण आता जे नुकसान पावसाने केले आहे, ते बघूनतरी या सरकारला पाझर फुटेल का? असा संतप्त सवाल देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला. (-  तुम्ही रात्री, अपरात्रीही भेटायला आला तरी आम्ही भेटणार, नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला ) काल बीड जिल्ह्यात 4 जणांचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला. आजही परळी तालुक्यातील गाडे पिंपळगाव येथील एक तरुण पुरात वाहून मयत झाला आहे. मात्र सरकारने अद्याप या घटनांची दखलही घेतल्याचे दिसत नाही. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या नशिबी आलेल्या या गंभीर परिस्थितीत सरकारने तातडीने मदत न केल्यास, रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या