JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जन्म झाला अन् 'ती'ला शौचालयाच्या बादलीत टाकलं; भयंकर घटनेनं बीड पुन्हा हादरलं

जन्म झाला अन् 'ती'ला शौचालयाच्या बादलीत टाकलं; भयंकर घटनेनं बीड पुन्हा हादरलं

जिल्ह्यात यापूर्वी देखील अनेक स्त्री भ्रूण हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 3 डिसेंबर : जिल्ह्यात यापूर्वी देखील अनेक स्त्री भ्रूण हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे.  या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्वच्छता गृहातील बकेटमध्ये स्त्री जातीचे मृतावस्थेतील अर्भक आढळून आले आहे.  बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ही घटना आहे. रुग्णालयाच्या अपघात विभागामधील स्वच्छतागृहातील पाण्याच्या बकेटमध्ये आज सकाळी हे अर्भक आढळून आले. ज्या बकेटमध्ये हे अर्भक आढळले ती पाण्याने भरलेली होती. त्यामुळे पाण्यात बुडवून अर्भकाला मारले की मृत अर्भक पाण्याच्या बकेटमध्ये टाकले याचा तपास आता पोलीस करत आहेत. बकेटमध्ये अर्भक टाकून पलायन   घटनेबाबत अधिक माहिती अशी की अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 35  नंबर हा अपघात विभाग आहे. येथे रुग्ण, नातेवाईक यांची मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञाताने अंदाजे दोन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक येथील स्वच्छता गृहातील बकेटमध्ये टाकून पलायन केले. हे अर्भक ज्या बकेटमध्ये आढळून आले आहे, ती बकेट पाण्याने भारलेली होती. त्यामुळे पाण्यात बुडवून अर्भकाला मारले की मृत अर्भकच  पाण्याच्या बकेटमध्ये टाकले याचा तपास आता पोलीस करत आहेत. हेही वाचा :   3 दिवसांपूर्वी बेपत्ता, घराच्या टाकीत मृतदेह; अश्विनीच्या गूढ मृत्यूने अमरावती हादरली!

 घटनास्थळी पोलीस दाखल  

स्वच्छता गृहाची सफाई करताना महिला कर्मचाऱ्याच्या निर्देशनास ही बाब आली.  त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. दरम्यान आता पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून हे अर्भक कोणी आणलं? महिला होती की, पुरुष? याचा शोध घेत आहेत.अर्भक मृत होते की, पाण्याच्या बकेट मध्ये बुडवून मारलं?, हे सत्य देखील पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या