JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed Crime : लग्नाची हळद निघण्यापूर्वीच पत्नीकडून पतीचा गेम, बीडमधील धक्कादायक घटनेने खळबळ

Beed Crime : लग्नाची हळद निघण्यापूर्वीच पत्नीकडून पतीचा गेम, बीडमधील धक्कादायक घटनेने खळबळ

बावीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार बीडच्या निपाणी जवळका गावात उघडकीस आला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 13 नोव्हेंबर : बावीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार बीडच्या निपाणी जवळका गावात उघडकीस आला होता. दरम्यान या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीने झोपलेल्या पतीचा गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गेवराई पोलिसात पत्नीविरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार समोर येताच सगळ्यानाच धक्का बसला आहे. नेमकं कोणत्या कारणावरून गळा दाबून खून करण्यात आला याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही.

गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका गावातील 22 वर्षीय पांडुरंग राजाभाऊ चव्हाण याचे व शीतल सोबत 14 ऑक्टोबर 2022 रोजी पौळाचीवाडी येथे रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. त्यानंतर नवरदेव मुलगा राजाभाऊ मला आवडत नाही, असे म्हणून शीतल त्याच्यासोबत सतत भांडण करत होती.

हे ही वाचा :  नवी मुंबई हादरली, दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा जागीच मृत्यू

संबंधित बातम्या

दरम्यान रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हे नवदाम्पत्य आपल्या खोलीत झोपले होते. रात्री साडेअकराच्या दरम्यान शीतल बेडरुम बाहेर येऊन सासू-सासर्‍याला म्हणू लागली की, पांडुरंग हे गार पडले आहेत. यावरून तातडीने राजाभाऊला नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.

या प्रकरणी सुनेनेच आमच्या मुलाला मारले आहे, असा संशय राजाभाऊच्या आई वडीलांनी व्यक्त केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत सहा दिवसानंतर शीतल विरोधात  कलम 302 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच शीतलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धुळ्याच्या बस ड्रायव्हरची आत्महत्या

धुळ्यातील एका बस चालकाने धक्कादायक पाऊल उचललल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान धुळे ते गुजरात बस चालकाने प्रवास केला गाडी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानकात लावली. अन् अचानक चालकाने थांबलेल्या बसमध्ये मध्यभागी असलेल्या नळीला दोरी बांधत गळफस घेतल्याने सगळ्यानाच धक्का बसला आहे. धुळ्यातील बसचालकाने गुजरातमध्ये आत्महत्या का केली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. नवीन पाटील असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

जाहिरात

हे ही वाचा :  ठाण्यात तब्बल 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त, 2 हजार रुपयांची बंडल पाहून पोलीसही हैराण

काल (दि.12) काही तासांचा प्रवास करत नवीन पाटील या बसचालकाने धुळे ते गुजरातमधील सुरत एसटी प्रवास केला. दरम्यान बस मध्यरात्री सुरतच्या उधना बस स्थानकात जाताच कोणी नसल्याचा अंदाज घेत. बसमध्ये दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान काही काळाने आत्महत्या केल्याचे समजताच बस स्थानकात एकच खळबळ उडाली होती.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या