JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ड्रोनमधून दिसणारं बदला’पूर’ : पाणीच पाणी चहूकडे, उल्हास नदी वाहतेय दुथडी भरून, पाहा Video

ड्रोनमधून दिसणारं बदला’पूर’ : पाणीच पाणी चहूकडे, उल्हास नदी वाहतेय दुथडी भरून, पाहा Video

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये (Badlapur) सध्या विविध भागात पाणी साचलं असून शहराच्या मधून जाणारी उल्हास नदी (Ulhas River) दुथडी भरून वाहत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 22 जुलै : महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूननं (Monsoon) सर्वदूर हजेरी लावली असून काही भागात संततधार तर काही भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याचं चित्र आहे. राज्यातील सखल भागात असणाऱ्या शहरांमध्ये सध्या पाणी साचण्याची समस्या उद्भवत असून जोरदार पावसाचा परिणाम दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये (Badlapur) सध्या विविध भागात पाणी साचलं असून शहराच्या मधून जाणारी उल्हास नदी (Ulhas River) दुथडी भरून वाहत आहे. गेल्या 24 तासात झालेला पाऊस पाहून बदलापूरकरांना 2005 सालची आठवण होत आहे. बदलापूरच्या विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे जोरदार पावसानंतर शहरात वेगवेगळ्या भागात पाणी साचतं. बदलापूरमध्ये गेल्या काही वर्षात शहरीकरणाचं प्रमाण वाढलं असून नदीच्या किनारपट्टी भागातही अनेक बांधकामं झाली आहेत. त्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी असणारी नैसर्गिक सुविधा कमी झाली असून पाणी वाहून जाण्याच्या आणि जमिनीत मुरण्याच्या वेगावरही मर्यादा आल्या आहेत.

संबंधित बातम्या

बदलापूरमध्ये सध्या रेल्वेट्रॅकवर पाणी साचलं असून पावसाचा जोर वाढला की हे पाणी अगदी प्लॅटफॉर्मपर्यंत वर चढण्याच्या घटना घडतात. आजूबाजूच्या डोंगराळ परिसरात झालेल्या पावसाचं पाणीदेखील ट्रॅकवर वाहत येत असल्यामुळे दर पावसाळ्यात बदलापूरकरांना या समस्येला सामोरं जावं लागतं. हे वाचा - LIVE: रत्नागिरी-खेडच्या शिरगावातला पूल गेला वाहून, 12 वाड्यांचा संपर्क तुटला रेल्वेसेवा ठप्प झाल्यामुळे बदलापूरकरांना इतर पर्यायांचा विचार करावा लागतो. मात्र अंतराचा विचार करता रस्तेमार्गाने मुंबईला पोहोचणे, हे पावसाळ्यात अत्यंत जिकीरीचे काम होऊन जाते. दैनंदिन प्रवासासाठी केवळ लोकलवर अवलंबून असलेला वर्ग सध्या सामान्यांसाठी लोकल बंद असल्यामुळे अगोदरच वैतागलेला आहे. त्यात आता पावसामुळे रस्तेदेखील पाण्याखाली गेल्यामुळे बदलापूरकरांच्या समस्यांमध्ये अधिकच भर पडली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या