JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बच्चू कडू माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले होते, फडणवीसांचा गौप्यस्फोट, रवी राणा पडले तोंडघशी!

बच्चू कडू माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले होते, फडणवीसांचा गौप्यस्फोट, रवी राणा पडले तोंडघशी!

‘मी स्वत: त्यांना फोन केला होता. आम्हाला सरकार स्थापन करायचे आहे, तुम्ही आमच्यासोबत यावं, असं सांगितलं होतं’

जाहिरात

'मी स्वत: त्यांना फोन केला होता. आम्हाला सरकार स्थापन करायचे आहे, तुम्ही आमच्यासोबत यावं, असं सांगितलं होतं'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑक्टोबर : ‘प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. मी स्वत: त्यांना फोन केला होता. आम्हाला सरकार स्थापन करायचे आहे, तुम्ही आमच्यासोबत यावं, असं सांगितलं होतं. आता बच्चू कडू यांनी कुणासोबत सौदा केला, काय केलं, असा आरोप करणे अत्यंत चुकीचे होते’ असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. रविवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कडू आणि राणा वादावर दोन तास चर्चा झाली. त्यानंतर सकाळी रवी राणा यांनी सकाळी फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर खुद्द फडणवीस यांनी खुलासा केला. प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. मी स्वत: त्यांना फोन केला होता. आम्हाला सरकार स्थापन करायचे आहे, तुम्ही आमच्यासोबत यावं, असं सांगितलं होतं. आता बच्चू कडू यांनी कुणासोबत सौदा केला, काय केलं, असा आरोप करणे अत्यंत चुकीचे होते. त्यांच्यावर आरोप करणे हे बरोबर नव्हते, असा खुलासाच फडणवीसांनी केला. ‘बाकीच्या आमदारांसोबत काय झालं हे मला माहिती नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सगळे जण गेले होते. रवी राणा यांची समजूत काढली. मी रागा रागात बोललो. दोघांनीही मान्य केलं की आम्ही रागामध्ये बोललो. त्यामुळे दोघांनी आता विकासासाठी काम करण्याचे ठरवले आहे’ असंही फडणवीसांनी सांगितलं. ‘सरकारला अडचण निर्माण होईल, असं कोणतीही काम ते करणार नाही. रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणावर पडदा पडला आहे’ असंही फडणवीसांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या