अपघात ग्रस्त वाहन
अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 12 जानेवारी : राज्यात सध्या अपघाताच्या अनेक घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता औरंगाबाद जिल्ह्यात आणखी एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. काळी पिवळी आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यात काळी पिवळीच्या चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. काय आहे संपूर्ण घटना - भीषण अपघाताची ही घटना पैठण शहागड रोडवरील आयटीआय जवळ घडली. पैठण-शहागड रोडवर असलेल्या आयटीआयसमोर काळी पिवळी आणि उसाच्या ट्रॅक्टर मध्ये भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात काळी पिवळी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, काळी पिवळी चालकाचे शिर धडावेगळे झाले होते. तर काळी पिवळी वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला. नारायण कुंडलिक पांगरे असे अपघातात मृतत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काळी पिवळी चालक शहागडकडे जात असतांना समोरून येणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रक्टरमध्ये जोरदार धडक जोराची धडक होऊन हा अपघात झाला. हेही वाचा - सहलीमध्ये शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य; गोंदिया हादरले, पोलीस आरोपीच्या मागावर
पोलिसांच्या वाहनाने मारल्या तीन पलट्या -
मुंबई- आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला. नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जातांना ही घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांच्या वाहनाचा वेग असल्याने वाहनाने तीन पलट्या मारल्या माहिती आहे. तर हा अपघात तिहेरी असल्याची माहिती माहिती समोर आली आहे. यामध्ये तिसरे वाहन अपघात होताच तातडीने पसार झाले आहे. या घटनेत नाशिक शहर दलाचे 3 पोलीस जखमी झाले आहेत. संतोष भगवान सौंदाणे (वय 57), सचिन परमेश्वर सुक्ले (वय 43), रविंद्र नारायन चौधरी (वय 37) अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. दरम्यान जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना अपघाताची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने अपघाताच्या ठिकाणी दाखल होऊन जखमींना वाडीवऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते.