JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पोळ्यासाठी बैल धुण्याकरता तलावाजवळ गेले अन् तिथेच मृत्यूनं गाठलं; काका-पुतण्याचा हृदयद्रावक अंत

पोळ्यासाठी बैल धुण्याकरता तलावाजवळ गेले अन् तिथेच मृत्यूनं गाठलं; काका-पुतण्याचा हृदयद्रावक अंत

पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादेतील फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे इथे घडली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अविनाश कानडजे, औरंगाबाद 26 ऑगस्ट : महाराष्ट्रात दरवर्षी पिठोरी अमावस्येच्या दिवशी (Pithori Amavasya 2022) बैल पोळा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. मात्र, आज या बैलपोळा सणादिवशीच हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा बुडून मृत्यू झाला. चोराचा प्रताप! पैसे नाही, तर चक्क एसटी तिकिटांची बॅग केली लंपास, कारण वाचून चक्रावून जाल पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादेतील फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे इथे घडली आहे. पोळ्याच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पंढरीनाथ कचरू काळे (वय 33) आणि रितेश अजिनाथ काळे (18) अशी मृत काका पुतण्याची नावे आहेत. बैलपोळा असल्याने बैल धुण्यासाठी पंढरीनाथ काळे हे पुतण्या रितेश आणि पवन यांना सोबत घेऊन शेतालगत असलेल्या पाझर तलावात गेले होते. बैल धुताना अचानक पंढरीनाथ यांना बैलाने झटका दिला. हा झटका अतिशय जोराचा असल्याने त्यांचा तोल गेला आणि ते तलावात पडले. काका तलावात पडल्याचे पाहून पुतण्या रितेशने त्यांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. VIDEO| ब्रेकअप केल्याच्या रागातून पेट्रोलपंपावर तरुणीवर जीवघेणा हल्ला रितेश आपल्या काकांना वाचण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ऐन पोळ्याच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बैल धुण्यासाठी गेलेल्या या चुलत्या पुतण्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या