JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : औरंगाबादमध्ये शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Aurangabad : औरंगाबादमध्ये शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये दोन सख्ख्या किशोरवयीन भावांचा शेततळ्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Aurangabad)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 06 सप्टेंबर : औरंगाबादमध्ये दोन सख्ख्या किशोरवयीन भावांचा शेततळ्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Aurangabad) औरंगाबाद तालुक्यातील करमाड जवळील दरकवाडी शिवारात ही घटना घडली. पार्थ धनंजय वाघ (वय 11) आणि अजिंक्य धनंजय वाघ (वय 9) अशी मृत भावंडांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान पार्थ आणि अजिंक्य यांच्या आई वडिलांना आक्रोश अनावर झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये दोन सख्ख्या किशोरवयीन भावांचा शेततळ्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद तालुक्यातील करमाड जवळील दरकवाडी शिवारात ही घटना घडली. पार्थ धनंजय वाघ (वय 11) आणि अजिंक्य धनंजय वाघ (वय 9) अशी मृत भावंडांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा :  मुद्याची लढाई गुद्यावर आली, मित्रानेच चाकूने सपासप वार करून मनसे शहराध्यक्षाचा केला खून

संबंधित बातम्या

दरम्यान पार्थ आणि अजिंक्य यांच्या आई वडिलांना आक्रोश अनावर झाला होता. दोघे भाऊ काल सायंकाळच्या सुमारास शेततळ्यावर गेले असता एक जण शेततळ्यात बुडायला लागल्यावर दुसऱ्या भावाने त्याला वाचवायला शेततळ्यात उडी मारली परंतु तो देखील पाण्यात बुडाला. यामुळे दोन्ही भावांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पनवेलमध्येही दोघांचा बुडून मृत्यू

पनवेल तालुक्यातील कोप्रोली येथील नदीत गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुण वाहून गेल्याची घटना रात्री अकराच्या सुमारास घडली. (Panvel Ganesh Visarjan) अग्निशामक दल, पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने रात्री त्यांचा शोध घेण्यात आला मात्र ते मिळाले नाहीत.आज पुन्हा सकाळपासून त्यांचा शोध घेण्यास अग्निशामक दल व पोलिसांनी सुरुवात केली आहे. अद्यापही त्यांचा शोध लागला नाही.

जाहिरात

हे ही वाचा :  ससून रुग्णालयात गोळीबार आणि चालल्या तलवारी, कुख्यात गुंडावर जीवघेणा हल्ला, पुणे हादरलं

कोपरोलीतील कमांडर सोसायटी येथील सात ते आठ जण गणपती विसर्जनासाठी गेले होते. दरम्यान रात्री भोरदार (गाढी) नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एक वाहून जात असल्याचा दिसून आले. त्याला वाचवण्यासाठी एक जण गेला असता तोही वाहून गेला. त्यानंतर दुसरा बॅटरी घेऊन धावत आला तो देखील वाहत गेला त्याच्या पाठोपाठ आलेले अन्य तिघेजण देखील वाहून जाऊ लागले. रात्रीची वेळ असल्याने यातील दोघेजण बेपत्ता झाले. तर चौघेजण बाहेर निघाले त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या