औरंगाबाद, 20 जुलै : राज्याची पर्यटन राजधानी ( Tourism capital ) म्हणून ओळख असलेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद. मात्र, औरंगाबाद शहरातील असलेल्या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या मकाई गेट ते टाऊन हॉल ( Makai Gate to Town Hall ) रस्त्याची अतिशय दुर्दशा ( Bad condition of the road ) झालेली आहे. त्यामुळे बिबी का मकबरा, बुद्ध लेणी यासोबतच विद्यापीठ व घाटी रुग्णालयाकडे जाणाऱ्या नागरिक व पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जगभरातून प्रवासी या शहरात पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी येतात त्यांना त्रास होत असल्यानने शहराची जगात बदनामी होतीये. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून महानगरपालिका प्रशासनाकडे केली जात आहे. औरंगाबाद शहर पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये ऐतिहासिक बिबी का मकबरा, बुद्ध लेणी यासह जागतिक पातळीचे ऐतिहासिक वारसा स्थळे आहेत. यामुळे या ठिकाणी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, या पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. 2 ते 3 इंचाचे खड्डे पडले आहेत, रिक्षांची चाके खड्ड्यांमध्ये फसत आहेत. यामुळे नागरिक व पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हेही वाचा- Osmanabad : शाळेसाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; वर्गात ना दरवाजा, ना खिडकी! खड्ड्यांमुळे मानेचा व पाठीचा त्रास वाढला रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नेहमी ये जा करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे गाडीचा खर्च वाढत आहे. त्यासोबतच नागरिकांना पाठीचा व मानेचा त्रास वाढत असल्याचे देखील येथील नागरिक सांगत आहेत. “टाऊन हॉल ते मकाई गेट हा रस्ता बिबी का मकबरा, बुद्ध लेणी, विद्यापीठ व घाटी रुग्णालयाला जोडतो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची चाळणी झाली असल्यामुळे या रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी महानगरपालिका प्रशासनाने हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिक मोईन शेख यांनी केली. दोन वर्षांपासून नागरिक त्रस्त दोन वर्षांपासून या रस्त्याची चाळणी झाली आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. काही पक्ष संघटनांनी आंदोलन केल्यानंतर मुरूम टाकून हे रस्ते बुजवण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपासून ह्या रस्त्यांची पुन्हा चाळणी झाली आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून येथील नागरिक या त्रासाला सामोरे जात आहेत. रस्त्याला लागूनच घाटी रुग्णालय असल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या अंबुलन्सला देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. हेही वाचा- Osmanabad : सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण; डोळ्यादेखत कोवळी पिके फस्त लवकर दुरुस्त करू या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, “या रस्त्याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करू आणि नागरिकांना चांगला रस्ता देऊ”. यामुळे हा रस्ता कधीपर्यंत दुरुस्त होतो हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे.