JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / फटाक्यांसोबत मस्ती, ठाण्यानंतर औरंगाबादमधील धक्कादायक VIDEO समोर...

फटाक्यांसोबत मस्ती, ठाण्यानंतर औरंगाबादमधील धक्कादायक VIDEO समोर...

दिवाळीत सर्वत्र फटाके फुटताना पाहायला मिळत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 25 ऑक्टोबर : दिवाळी सणाच्या दिवशी सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. लक्ष्मीपूजनानंतर आसमंत उजाळून निघाले होते. फटाके फोडून सर्वांनी आनंद साजरा केला. पण, याचदरम्यान औरंगाबादमध्ये तरुणांच्या टोक्यांकडून एकमेकांच्या अंगावर फेकून फटाके फोडण्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खामगाव येथे मुलांच्या तीन वेगवेगळ्या गटात तुफान फटाकेबाजीचा स्टंट पाहायला मिळाला. या व्हिडिओमध्ये फटाके फोडणारे तरुण एकमेकांच्या अंगावर फटाके फेकताना पाहायला मिळतात. तर मुलांनी केलेल्या स्टंटबाजीच्या ठिकाणावरून उडद बाजार पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. पोलिसांना माहिती लागतच पोलिस येण्याच्या अगोदर या तरुणांनी पळ काढला.

संबंधित बातम्या

ठाण्यातही अशी दिवाळी पाहून पोलीसही हादरले - दिवाळीत सर्वत्र फटाके फुटताना पाहायला मिळत आहे. जमिनीपासून आकाशापर्यंत फटाक्यांचा धूमधडाका दिसतो आहे. फाटाके दिसायला जितके आकर्षक तितकेच ते खतरनाक. फटाके फोडताना केलेली छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. असं असताना काही लोक मात्र फटाक्यांसोबत नको ते खेळ खेळतात. फटाक्यांसोबत असाच जीवघेणा खेळ खेळणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून पोलीसही हादरले आहेत.

हा तरुण बिल्डिंगच्या खाली उभा राहून रॉकेट फोडतो आहे. पण हे रॉकेट तो थेट बिल्डिंगवर सोडतो आहे. चुकून वगैरे नाही तर मुद्दामहून तो इमारतीतील एका एका घरात रॉकेट सोडताना दिसतो आहे. या रॉकेटबाजमुळे नागरिक दहशततीत आहेत. काही लोकांनी या तरुणाच्या प्रतापाता व्हिडीओ बनवला आणि इन्स्टाग्रामवर अपलोड केला. ठाण्याच्या उल्हासनगरमधील ही घटना आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ठाणे पोलीसही हादरले. ठाणे पोलीस आय़ुक्तांच्या आदेशानुसार उल्हासनगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या