चंद्रकांत खैरे
औरंगाबाद, 3 जून : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या नामांतरणाबाबत मोठं विधान केलं आहे. औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन जिल्ह्यांच्या नामांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असा मोठा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. नामांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर औरंगाबादला संभाजीनगर (Sambhajinagar) तर उस्मानाबादला धाराशिव (Dharashiv) अशी ओळख दिली जाईल, अशी माहिती खैरे यांनी दिली. “शिवसेनेने 1988 साली महापालिका जिंकल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शहरात विजय मेळावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी हेच सांगतितलं होतं की, औरंग्या कशाला पाहिजे? त्याने आपल्या हिंदू धर्मियांना खूप त्रास दिला. मंदिरं तोडली, संभाजी महाराजांना किती त्रास दिला? अशा माणसाचं नाव कशाला ठेवायचं? म्हणून या शहराचं नाव मी संभाजीनगर ठेवतो. तेव्हापासून आम्ही संभाजीनगर म्हणतो. संभाजीनगरचं नामांतरण आम्ही मंत्री असताना झालेलंच होतं. उद्धव ठाकरे पूर्णपणे कायशीरपणे करतील. ही कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे झालेलीच आहे”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. ( ‘मला सगळे विचारतात की तुमचं काय होणार…’, पंकजांचं स्वत:च्या राजकीय वाटचालीबाबत महत्त्वाचं विधा न) औरंगाबाद शहराच्या नामांतरणाचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेला कारण ठरलेला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत भाषण करताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला होता. आपण स्वत: संभाजीनगर म्हणतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांची 8 जूनला सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत औरंगाबादचं संभाजीनगर असं अधिकृतपणे नामांतरणं उल्लेख केलं जाईल, अशी देखील माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. पण त्याबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आली नव्हती. यानंतर आता चंद्रकांत खैरे यांनी नामांतरणाबाबत मोठं विधान केलं.