JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'उद्धव साहेब, तिळगुळ घ्या' शिंदे गटाच्या आमदाराला आठवली 'मातोश्री'

'उद्धव साहेब, तिळगुळ घ्या' शिंदे गटाच्या आमदाराला आठवली 'मातोश्री'

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे कायमच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 14 जानेवारी :  शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे कायमच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मकर संक्रांतीनिमित्त माला उद्धव ठाकरे साहेबांना तिळगुळ द्यायला आवडेल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रू नसतो, आम्ही शत्रू नाही आहोत, बाळासाहेबांची सर्वांवर प्रेम करण्याची आम्हाला शिकवण आहे, त्यामुळे मला उद्धव ठाकरे यांना तिळगुळ द्यायला आवडेल असं संजय सिरसाट यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हटलं संजय सिरसाट यांनी?  शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अनेकदा ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. ते आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.   मकर संक्रांतीनिमित्त माला उद्धव ठाकरे साहेबांना तिळगुळ द्यायला आवडेल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रू नसतो, आम्ही शत्रू नाही आहोत, बाळासाहेबांची सर्वांवर प्रेम करण्याची आम्हाला शिकवण आहे, त्यामुळे मला उद्धव ठाकरे यांना तिळगुळ द्यायला आवडेल असं संजय सिरसाट यांनी म्हटलं आहे. हेही वाचा :  तांबेंच्या विरोधात शुभांगी पाटील मैदानात; ठाकरे गट पाठिंबा देणार? ‘मातोश्रीवर’ बैठक ठाकरे गटाला पुन्हा टोला   दरम्यान त्यांनी दुसरीकडे ठाकरे गटावर निशाणा देखील साधला आहे.  17 तारखेला निवडणूक आयोगाचा निकाल आहे. निकाल आमच्या बाजूने लागल्यावर मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे गटाचे नेते, आमदार आणि अगदी नगरसेवकही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमच्या पक्षात प्रवेश करतील, असा खळबळजनक दावा आमदार संजय शिरसाठ यांनी केला आहे . अनेक नेते खासगीत आमच्याशी बोलतात, ते सर्व 17 तारखेच्या निकालाची वाट पहात आहेत. निकाल लागल्यानंतर सर्व चित्रच बदलेल असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या