JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shani Jayani 2022 : नेवपूर वाकीत पहिल्यांदाच घडलं असं, महिलांच्या हस्ते शनिदेवांचा अभिषेक

Shani Jayani 2022 : नेवपूर वाकीत पहिल्यांदाच घडलं असं, महिलांच्या हस्ते शनिदेवांचा अभिषेक

देवस्थानचे सुखदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम झाला. सकाळी शनि महाराजांची पुजा करण्यात आली. यानंतर महाआरतीही करण्यात आली.

जाहिरात

फोटो क्रेडिट - लोकमत

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 1 जून : दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला शनि जयंती (Shani Jayanti 2022) श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे साजरी केली जाते. या दिवशी शनी देवांचा जन्म झाला होता. विशेष म्हणजे शनी जयंती आणि सोमवती अमावस्या (Somvati Amavasya) एकाच दिवशी आले आहे. त्यामुळे शनीदेवाची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते. त्यामुळे सोमवती अमावस्येला नेवपूर वाकी (Nevpur Waki) येथील श्री क्षेत्र शनैश्वर देवस्थान येथे शनिजन्मोत्सव (Shani Janmotsav) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नेवपूर-वाकी येथे पहिल्यांदाच एक घटना घडली आहे. काय घडलं? यावर्षी पहिल्यांदाच शनिदेवांच्या मंदिरात महिलांना प्रवेश देण्यात आला. इतकेच नव्हे तर श्री श्री 1008 महामंडलेश्वर सुखदेव महाराज यांनी महिलांच्या हस्ते शनिदेवांचा अभिषेकही करुन घेतला. देवस्थानचे सुखदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम झाला. सकाळी शनि महाराजांची पुजा करण्यात आली. यानंतर महाआरतीही करण्यात आली. तसेच सकाळी 11 वाजेच्या सुमारास तेल, दही, दुध, पंचामृत आणि शुद्ध पाण्याने भरलेल्या कलशांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी पहिल्यांदाच एक निर्णय घेण्यात आला. सुखदेव महाराज यांनी शनिदेवांच्या मंदिरांत अभिषेक आणि आरतीसाठी महिलांना प्रवेश देण्याचे निर्णय घेतला. यानिर्णयाचे सर्व भाविकांनी स्वागत केले. त्यानुसार यानंतर महिलांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी सुखदेव महाराज यांनी शास्त्राप्रमाणे महिलांनी देवाची पुजा कधी करावी आणि कधी करू नये, याबाबत आपल्या प्रवाचनातून उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. हेही वाचा -  Shani Jayanti 2022: शनि शिंगणापूर येथील जयंती उत्सवात ‘या’ चार पूजा साहित्यांवर बंदी, भाविकांकडून स्वागत शनि जयंती दिनी भाविक करतात हे उपाय शनि जयंतीच्या दिवशी शनी चालीसेचे पठन केले जाते. ह्या पठणाने शनी देव प्रसन्न होतात. असं करणं भाविक फलदायी मानतात. शनि जयंतीच्या दिवशी दानाला विशेष महत्व आहे. यादिवशी गरजू लोकांना दान करणे, शनी जयंतीच्या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने लाभ प्राप्त होतो. यादिवशी हनुमानाच्या पूजेला विशेष महत्व आहे. हनुमानाची पूजा करणाऱ्या लोकांवर शनी देवाची वाईट दृष्टी पडत नाही अशी धारणा भाविकांची आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या