JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : बंडखोरीनंतर संदीपान भुमरेंसोबत भयंकरच घडलं; मंत्री होऊन आले तरीही नागरिकांची पाठ?

Video : बंडखोरीनंतर संदीपान भुमरेंसोबत भयंकरच घडलं; मंत्री होऊन आले तरीही नागरिकांची पाठ?

एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदाराला पाहावं लागलं हे चित्र…या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 27 ऑगस्ट : शिंदे गटातील बंडखोर नेते संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात अनेक खुर्च्या रिकामी असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओनंतर ठाकरे गटातील नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्यांवरुन नागरिकांनी बंडखोरीमुळे त्यांच्याकडे पाठ फिरवल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पैठण शहरात आलेल्या संदीपान भुमरे यांच्याकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचं म्हटलं जात आहे. संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात अवघे 100 ते 150 लोकांची उपस्थिती होती. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला मोठा दिलासा, उद्धव ठाकरेंना नामी संधी, शिंदेंना फटका बसणार? संदीपान भुमरे मंत्री होऊनही लोक न आल्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.

पैठणमध्ये एका आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात संदीपान भुमरे यांनी उपस्थिती लावली होती. मात्र या  कार्यक्रमातील अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात मात्र नागरिकांची तुफान गर्दी जमा होत असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या