भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा औरंगाबाद दौरा आहे. ते औरंगाबाद लोकसभा आढावा बैठकही घेणार आहेत.
औरंगाबाद, 02 जानेवारी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहे. पण, या दौऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांचं कार्यक्रम पत्रिकेवरच नावच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना डावलण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा औरंगाबाद दौरा आहे. ते औरंगाबाद लोकसभा आढावा बैठकही घेणार आहेत. जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. जाहीर सभेच्या निमंत्रण पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचे नाव नसल्याने पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंढे या राष्ट्रीय सचिव पदावर आहेत. मात्र त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर छापले नाही.औरंगाबाद लोकसभेच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे प्रत्येक वेळी सभा घेतात. आता त्यांचे नाव पत्रिकेवर नसल्याने त्या सभेला उपस्थित राहणार की नाही हा सस्पेन्स निर्माण झाला आहे. (भाजपच्या मिशन महाराष्ट्राला सोमवारपासून सुरूवात, शिंदे गटाचं टेन्शन वाढणार?) विशेष म्हणजे, रविवारीच बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे आले होते. यावेळी जाहीर कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे गैरहजर होत्या. दरम्यान, भाजपने मिशन 144’ ची घोषणा केली आहे. या मिशनची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आज पासून चंद्रपुरातून करणार आहेत. यासाठी ते आज चंद्रपूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली आहे. जे. पी. नड्डा हे चंद्रपूरला दाखल झाल्यानंतर महाकालीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सिव्हिल लाईनच्या न्यू इंग्लिश ग्राउंडवर त्यांच्या सभेचे आयोजन केले आहे. (Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या मनात काय? नवीन वर्षाच्या नव्या संकल्पाने चर्चांना उधाण!) भाजपच्या ‘लोकसभा टीमशी’ संवाद साधल्यानंतर औरंगाबादसाठी रवाना होतील. या दौऱ्यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची उपस्थिती राहणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला, त्या सर्व ठिकाणी भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठीच राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. याआधी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा दौरा करून केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी आणि भाजपच्या पक्षसंघटनाविषयक विविध मुद्द्यांची हाताळणी केली होती. त्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे चंद्रपुरात येत आहेत. पुढील लोकसभा निवडणुक एप्रिल-मे २०२४ मध्ये होणार असल्या तरी भाजपने देशभरात तयारी सुरू केली आहे. निवडणूकपूर्व प्रचार सुरू करण्यासाठी नड्डा हे प्रत्येक राज्यात दौरे करणार आहेत.