JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : तिरस्कार करणारी लोकं आता... साक्षी मलिकनं सांगितला तो अनुभव, Video

Aurangabad : तिरस्कार करणारी लोकं आता... साक्षी मलिकनं सांगितला तो अनुभव, Video

ऑलिम्पिक मेडल विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकनं आपल्या संघर्षाच्या काळातील एक अनुभव सांगितला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 19 डिसेंबर :  कोणताही खेळाडू देशाची मान उंचवावण्यासाठी कठोर मेहनत घेत असतो. देशातील मेडल विजेत्या खेळाडूंची संख्या वाढवायची असेल तर शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे, असं मत ऑलिम्पिक मेडल विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकनं व्यक्त केलंय. साक्षी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलत होती. यावेळी तिनं खेळामुळे आलेला एक अनुभव देखील सांगितला. विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र औरंगाबादच्या  वंदे मातरम सभागृहामध्ये पद्म महोत्सवात सुरू आहे. या महोत्सवामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. यातलाच एक उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांचा जागतिक साक्षी मलिकसोबत विद्यार्थ्यांची संवाद आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. साक्षी मलिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीचा कानमंत्र दिला. साक्षी यावेळी म्हणाली की, ’ सतत मेहनत आणि ध्येयाकडे लक्ष दिल्याने मला ऑलम्पिकमध्ये यश मिळाले. मी कुस्ती या खेळाची निवड केली. माझ्या कामगिरीमुळे देशाला अभिमान वाटला यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते. यश मिळवण्यासाठी त्याग, परिश्रम, आणि समर्पण आवश्यक आहे. प्रत्येकाचं आपल्या ध्येयावर प्रेम हवं. स्वत:मधला माणूस जिवंत ठेवा. त्यामुळे लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल.’ मेस्सी साहेबांनी वर्ल्ड कप जिंकला, फुटबॉलवेड्या कोल्हापुरात एकच जल्लोष… Video ‘तो’ अनुभव केला शेअर साक्षी मलिकनं विद्यार्थ्यांशी बोलताना आयुष्यातील एक खास अनुभव देखील शेअर केला. मी शाळेतील प्रत्येक खेळामध्ये सहभागी होत असे.  मला ताकतवान खेळाबद्दल आवड होती. त्यामुळे मी कुस्ती खेळायला सुरुवात केली. मला आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा होता. त्यांच्या पाठिंब्यामुळे बाराव्या वर्षापासून मी कुस्ती सुरू केला. थायलंडमधील जलतरण स्पर्धेत कोल्हापूरकर चमकले, 2 पदकांची केली कमाई कुस्ती हा पुरुषांचा खेळ आहे मुलींनी खेळू नये, असं नातेवाईकांनी सांगितलं.  त्यांनी माझा तिरस्कार केला. मला मुलांसोबत सराव करावा लागला. सरावासाठी मी लग्नाला जाणे टाळले.  शाळेत गेल्यानंतर मला मुली चिडवत असत पण, मी कधी त्याकडे लक्ष दिलं नाही. आता यापूर्वी नावं ठेवणारी मंडळी मी कधी येणार याची आई-वडिलांकडे विचारणा करतात. त्यांना माझ्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा असते. मी घरी कधी येणार याची ते वाट पाहात असतात, इतका मोठा बदल आता झाला आहे, असे साक्षीनं स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या