JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : गणेशोत्सावानिमित्त कुस्त्यांची दंगल, राष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीनं गाजवला आखाडा! VIDEO

Aurangabad : गणेशोत्सावानिमित्त कुस्त्यांची दंगल, राष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीनं गाजवला आखाडा! VIDEO

जिल्हा गणेश महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद मैदान येथे कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 06 सप्टेंबर : कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा गणेश महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद मैदान येथे कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता. या आखाड्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील मातब्बर कुस्तीपटू सहभागी झाले होते. या कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये राष्ट्रीय कुस्तीपटू सोनाली गिरगे नावाच्या कुस्तीपटूने कुस्तीचा आखाडा गाजवला. औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघाच्या वतीने विविध गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व वयोगटातील कुस्तीपटूंसाठी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सर्वच वयोगटातील कुस्तीपटू सहभागी झाले होते. हेही वाचा :  Aurangabad: तुमची मुलं काय करतात? रोज 10 टक्के विद्यार्थी शाळेत पोहचत नसल्याची माहिती उघड, VIDEO सोनाली गिरगेने गाजवला आखाडा प्रशिक्षक पैलवान गणेश दसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण येथील धर्मवीर कुस्ती केंद्राची राष्ट्रीय कुस्तीपटू सोनाली गिरगे, विशाखा चव्हाण, रूपाली शिंदे, तृप्ती पवार, संजीवनी चव्हाण, पुनम गाडे, साक्षी काटकर या महिला कुस्तीपटूंचा सहभाग होता. महिलांच्या कुस्तीमध्ये राष्ट्रीय कुस्तीपटू सोनाली गिरगे हिने कुस्तीचा आखाडा गाजवला. खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी आयोजन यावर्षी जिल्हा गणेश महासंघाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये एक कुस्तीपटूंसाठी कुस्तीच्या आखाड्याचा आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये जिल्हाभरातून मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी झाले होते. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावा यासाठी हा आमचा प्रयत्न असल्याचा जिल्हा महासंघाचे अध्यक्ष विजय औताडे यांनी सांगितले. हेही वाचा :  मटकीचा चमचमीत रस्सा आणि टम्म फुगलेली पुरी; ‘समाधान’ने जपली 23 वर्षांची परंपरा, VIDEO मुलींनी कुस्तीच्या आखाड्यात उतरले पाहिजे  मुली मर्यादित क्षेत्रामध्येच आपलं भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, मी लहानपणापासून कुस्तीमध्ये सराव करते अनेक आखाडे मी गाजवले आहेत. त्यामुळे मुलींनी देखील कुस्तीचे मैदान गाजवली पाहिजे असं मला वाटतं असं मतं राष्ट्रीय कुस्तीपटू सोनाली गिरगेने यावेळी व्यक्त केले. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड म्हणाले की, खेलो इंडिया अभियानाचा खेळाडूंनी लाभ घ्यावा. यासाठी काही मदत हवी असेल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या संदर्भात राज्य सरकार तर्फे प्रस्ताव पाठवून आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे म्हणाले. या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जयस्वाल, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष विजय औताडे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजू शिंदे, अनिल मानकापे, किशोर तुळशीबाग वाले, मनोज पाटील, हर्षवर्धन कराड, पोलीस निरीक्षक डॉक्टर गणपत दराडे, राजेंद्र दाते पाटील,सचिन आंबोरे उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या