औरंगाबाद, 21 मे : औरंगाबाद (Aurangabad News) शहरात भरदिवसा विद्यार्थिनीचा खून (Killed Student) केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरातील देवगिरी कॉलेज परिसरात ही घटना घडली. विद्यार्थिनीला कॉलेजपासून 200 फूट ओढत नेत तिची सुऱ्याने भोसकून हत्या करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र भर दिवसा कॉलेजमधील विद्यार्थिनीची अशा प्रकारे हत्या केल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा सवाल उपस्थित केला आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने कॉलेजमधील विद्यार्थिनीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. तरी पोलीस आरोपीचा शोध घेत असून लवकरच या प्रकरणात अटक करणार असल्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
या घटनेनंतर आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात एक मुलगा विद्यार्थिनीला ओढून नेत असताना दिसत आहे. विद्यार्थीनीच्या खुणामुळे औरंगाबादेत खळबळ उडाली आहे.