JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : पर्यटनाच्या राजधानीची नवी ओळख, मेडिकल टुरिझमसाठी मिळतीय पसंती, Video

Aurangabad : पर्यटनाच्या राजधानीची नवी ओळख, मेडिकल टुरिझमसाठी मिळतीय पसंती, Video

जागतिक वारसास्थळाच्या माध्यमातून जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर आलेले औरंगाबाद शहर हे आता वैद्यकीय पर्यटन म्हणून वाढीस लागत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 22 डिसेंबर : जागतिक वारसास्थळाच्या माध्यमातून जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर आलेले औरंगाबाद शहर हे आता वैद्यकीय पर्यटन म्हणून वाढीस लागत आहे. मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून आखाती देशातील 15 ते 18 रुग्ण महिन्याकाठी उपचारासाठी राज्याची पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद मध्ये येत आहेत. यामुळे याचा फायदा डॉक्टर यांना होत आहे. औरंगाबाद शहरांमध्ये पर्यटन आणि नोकरीच्या निमित्ताने विदेशातील नागरिक या ठिकाणी येत असतात. तसेच शहरामध्ये शिक्षणानिमित्त विद्यापीठ व विविध महाविद्यालयांमध्ये विदेशी विद्यार्थी येत असतात. त्यांचा रेफरन्स देऊन विदेशी रुग्ण औरंगाबाद शहरात उपचारासाठी येत आहेत. इतर देशाच्या तुलनेत औरंगाबाद शहरांमध्ये कमी दरामध्ये दर्जेदार उपचार मिळतात. यात प्रामुख्याने सांधे प्रत्यारोपण, गुडघे, मणक्याचे आजार, दबलेली नस, (स्पाइन सर्जरी) जॉइंट रिप्लेसमेंट अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाचा समावेश आहे.

Coronavirus : देशात कोरोनाचा कहर वाढू नये म्हणून तज्ज्ञांनी केल्या गंभीर सूचना, Video

संबंधित बातम्या

काय आहे मेडिकल टुरिझम? ज्याप्रमाणे औरंगाबाद शहरांमध्ये वारसा स्थळ आहेत. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक या ठिकाणी येत असतात. त्याचप्रमाणे इतर देशांमध्ये वैद्यकीय सुविधा महाग असल्यामुळे इतर देशातील रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात. इतर ठिकाणाहून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णामुळे निर्माण होणारा  आर्थिक फायदा याला मेडिकल टुरिझम असं म्हंटले जाते, असं घाटी रुग्णालयातील वरिष्ठ डॉ.एम. बी. लिंगायत सांगतात. …म्हणून विदेशातील रुग्ण या ठिकाणी येत आहे भारतीय डॉक्टरांची उपचार पद्धती जगभरात पोहोचली आहे. त्यामुळे कमी खर्चात दर्जेदार वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी विदेशातील रुग्ण येतात. विशेष म्हणजे औरंगाबाद मधील काही डॉक्टर हे यापूर्वी इतर विदेशी देशांमध्ये जाऊन सेवा देऊन आले आहेत. यामुळे देशातील डॉक्टरांची ख्याती विदेशात आहे. याचा परिणाम म्हणून विदेशातील रुग्ण या ठिकाणी येत आहे. याचा फायदा ज्याप्रमाणे डॉक्टरांना होतो. त्याचप्रमाणे शहराच्या अर्थकारणाला सुद्धा होत आहे, असं डॉ.एम. बी. लिंगायत यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या