औरंगाबाद, 14 जानेवारी : मकर संक्रांती निमित्त औरंगाबाद शहरात उत्साहाचे वातावरण आहे. मकर संक्रांतीनिमित्त बाजारात आकर्षक पतंग दाखल झाले असून खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. यंदा बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पतंगांची विक्रीही जोरात आहे. खलमी, दुग्गा, आद्दा, पौना, बडा, कन, कव्व, ढाचा, डूम्मी या पतंगाची ग्राहकांमध्ये मागणी असून 5 रुपयांपासून तुम्ही खरेदी करू शकता, असं विक्रेत्यांनी सांगितलं आहे. कधी होते पतंग बनवायला सुरुवात? शहरात बुढी लाईन भागामध्ये जुना बाजार आहे. या ठिकाणी पतंग बनवण्याचे काम चालतं. या भागामध्ये 50 वर्षांपासून हिरालाल राजपूत पतंग विक्रीचा व्यवसाय करत आहेत. या ठिकाणाहून औरंगाबादसह मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पतंग पुरवला जातो. संक्रांतीच्या 6 महिन्या अगोदर पासून पतंग बनवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते, असं अनिल राजपूत यांनी सांगितलं.
बाजारात कोणते पतंग आहेत उपलब्ध? खलमी, दुग्गा, आद्दा, पौना, बडा, कन, कव्वा , ढाचा, डूम्मी हे पतंग बाजारामध्ये उपलब्ध आहेत. धाग्याचे बंडल दाघा कृष्णा, हाई फ्लोर,गन, व्हिक्टर, सूर्या, हाईय फ्लोरा, बलून हे धाग्याचे बंडल बाजारात उपलब्ध आहेत. दोरीचा मांजा बरेली, खलिफा, यासीन, चुटका मैदानी, डब्बल स्पेशल, ताऊसिफ, पांडा, ब्लॅक पँथर, शन्ना मैदानी, एन आर के, रियासात, ब्रम्होस उपलब्ध आहेत.
Makar Sankrant 2023 : कशी बनवतात भोगीची पारंपरिक भाजी? पाहा Video
अशा आहेत पतंगाच्या किंमती 5 रुपयांपासून पतंगाची किंमत सुरू होते तर 50 रुपयांपर्यंत पतंग बाजारात उपलब्ध आहेत. कोरोनानंतर यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये मकर संक्रांत साजरी होणार आहे. ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदा बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पतंगांची विक्रीही जोरात आहे, असं पतंग विक्रेते अनिल राजपूत यांनी सांगितलं.