औरंगाबाद, 10 जानेवारी : मकर संक्रातीचा सण हा आता काही दिवसांवर आल्यानं महिला वर्गामध्ये खरेदी करण्याची लगबग वाढली आहे. संक्रातीला बांगड्यांचं महत्त्व मोठं असतं. या निमित्तानं बाजाराते वेगवेगळ्या रंगाच्या आकर्षक बांगड्या दाखल झाल्या आहेत. त्याचवेळी पिवळ्या रंगांच्या बांगड्याकडं महिला पाहण्यासही तयार नाहीत. या बांगड्या खरेदी करण्यास महिला नकार देत आहेत. औरंगाबादच्या बाजारेपेठत हे चित्र सर्रास दिसतंय. याचं काय कारण आहे पाहूया कोणत्या बांगड्यांना मागणी? संक्रातीच्या निमित्तानं सौभाग्याचं लेणं म्हणून महिला बांगड्या खरेदी करतात. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर दोन वर्षांनी बांगड्याचा बाजार यंदा सजला आहे. औरंगाबाद शहरातील बाजारपेठेमध्ये तब्बल सहा ट्रक म्हणजेच अडीच लाख डझन बांगड्या दाखल झाल्या आहेत. औरंगाबाद शहरांमध्ये सात होलसेल दुकाने आहेत तर तीनशे दुकानदार आणि 500 हून अधिक फेरीवाले बांगड्या विक्री करत आहेत. वेलवेट, साई पकडे, पुष्पांजली, वेलवेट, मेटलवाला, काचेच्या बांगड्या, बेबी डॉल, जेरी वर्क, लटकन गोट इत्यादी प्रकारच्या बांगड्या उपलब्ध आहेत. या सर्व बांगड्यांना मागणी असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. 300 रुपयांपासून करा संक्रात स्पेशल साडीची खरेदी, पाहा Video पिवळ्या रंगाकडं पाठ का? यावर्षी संक्रांतीचे वाहन म्हणून वाघ आणि उपवान म्हणून घोडा आहे. ही संक्रांत कुमारी अवस्थेत असून पिवळे वस्त्र नेसलेले आहे पिवळ्या रंगाने रंगवलेल्या वस्तू परिधान करू नये, अशी माहिती वेद शास्त्राचे अभ्यासक सुरेश केदारे गुरूजी यांनी दिली आहे. कोरोना निर्बंध उठल्यानं यावर्षी व्यवसाय चांगला होईल अशी अपेक्षा आहे. मात्र यंदा पिवळ्या बांगड्या घेण्यास महिला नगर देत आहे याचा काही प्रमाणात फटका बसू शकतो, असा अंदाज बांगड्यांच्या दुकानांचे मालक नंदकिशोर वडगावकर यांनी दिली. दोन वर्षानंतर संक्रांत हा सण साजरा करत आहोत यामुळे उत्साहाचा वातावरण आहे खरेदी करण्यासाठी आम्ही बाजारात आलो आहोत मात्र यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत असल्यामुळे पिवळ्या रंगाच्या बांगड्या व वस्तू प्रधान करण्यासाठी आम्ही टाळणार आहोत, असं संक्रातीनिमित्त खरेदीसाठी आलेल्या ग्राहक सारिका टेकाळे यांनी सांगितलं.
‘विश्वास ठेवू नका’ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शहाजी भोसले यांच्याशी आम्ही या विषयावर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी या प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडू नका असं आवाहन केलं. ‘सर्व रंग हे निसर्गाची देण आहे विज्ञानवादी युगात अंधश्रद्धा पसरवण्याचा हा डाव असून नागरिकांनी अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये. सण आनंदात साजरा करावा. त्यांना आवडेल त्या रंगाचे कपडे, बांगड्या, दागिने आणि इतर साहित्य खरेदी करावे,’ असं भोसले यांनी सांगितलं.