औरंगाबादच्या तरुणांची नामी शक्कल; सरकारी योजनेतंर्गत केली रोजगार निर्मिती
औरंगाबाद, 25 मे : राज्यात गेल्या काही वर्षांपासून शासकीय नोकर भरती (Government servant recruitment) झाली नाही. आणि यामुळेच शासकीय नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. राज्यात शासकीय नोकरी (Unemployment) भरती लवकर निघत नसल्याने बेरोजगारीमध्ये मोठी वाढ होत आहे. याचबरोबर मागच्या काही महिन्यांत राज्यातील नोकर भरतीमध्ये मोठे घोटाळे होत असल्याने काही सुशिक्षित बेरोजगारांनी या नोकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. तर काहींनी आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करत बेरोजगारीवर मात केली आहे.
राज्यात सर्वत्र बेरोजगारीच्या नावाने ओरड सुरू असताना औरंगाबादमधील काही बेरोजगारांनी आपल्या कौशल्यातून बेरोजगारीवर मात आपल्यासोबत दुसऱ्यांना रोजगार देण्याचे काम सुरू केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील उच्चशिक्षित तरुणांनी कौशल्याधारित शिक्षणाची कास धरली आहे.
हे ही वाचा : वायूसेनेच्या अधिकाऱ्यावर तब्बल 28 गोळ्या झाडल्या, क्रूर यासिन मलिकच्या कुकृत्यांचा पाढा
तरुणांनीच केली रोजगार निर्मिती
या कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगारीवर मात करत इतरांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उच्चशिक्षित तरूणांनी सांगितले आहे. राज्याच्या नोकऱ्यांवर अवलंबून राहिल्याने वेळ आणि वय वाया जात असल्याचेही त्यांचे मत आहे. एखाद्यावेळेस पद नाही मिळाले तर निराशाही येऊ शकते यामुळे या तरूणांनी रोजगार निर्मिती सुरू केली आहे. अनेक तरुणांची परिस्थिती नसताना देखील ते दिवस-रात्र काम करून शिक्षण घेत आहेत. मात्र शासकीय नोकर भरती गेल्या अनेक वर्षांपासून होत नाहीये. यामुळेच पालकांसह तरुणांमध्ये भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे औरंगाबाद शहरातील काही तरुणांनी कौशल्याधारित शिक्षणाची कास धरली आहे.
हे ही वाचा : अभिमानास्पद! 26 वर्षीय कॅप्टन अभिलाषा आर्मीतल्या पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर चालक, लष्कराने केला असा सन्मान
स्किल डेव्हलपमेंट योजनेचा सदुपयोग
केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्किल डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत ते शहरातील खडकेश्वर येथील जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मेकॅनिकच शिक्षण ते घेत आहेत. आणि या घेतलेल्या शिक्षणाच्या आधारावरच स्वतःचं रोजगार निर्माण करून आपल्या परिचयातील लोकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हे तरुण सांगतात. कौशल्याधारित शिक्षण घेणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांनी अनेकांसमोर आपला आदर्श ठेवला आहे. भविष्यात ते मोठ्या स्तरावर रोजगार निर्मीती करणार असल्याचे सांगतात. यामुळे केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्किल डेव्हलपमेंट योजनेचा आम्ही पुरेपूर लाभ घेणार असल्याचेही ते म्हणाले.