औरंगाबाद, 26 नोव्हेंबर : लावनी हा कलाप्रकार मोबाईल आणि टीव्हीच्या जमान्यांमध्ये धोक्यात आला आहे. मोबाईल आणि टीव्ही वरती बघितलेले अश्लील दृश्य प्रेक्षकांना आता लावणी या कला प्रकारातून कलाकवंतांनी दाखवावे अशा अपेक्षा प्रेक्षक व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कला प्रकाराबाबत मोबाईल आणि टीव्हीमुळे प्रेक्षक जर असा विचार करत असेल तर ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बाब असल्याचे लावणी कलावंत शिवकन्या कचरे औरंगाबाद येथे बोलताना म्हणाल्या. लावणी कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर करतात. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावण्यगीत व लावणी शब्द तयार झाला आहे. लावणी हा कलाप्रकार शृंगार व भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम समजले जाते. महाराष्ट्र प्रांतातील लावणी ही लोकप्रिय संगीताची एक शैली आहे. लावणी म्हणजे पारंपारिक गाणे आणि वृत्त संयोजन आहे. यामध्ये तुंतुने, ढोलकी इत्यादी पारंपारिक वाद्यांचा वापर होतो. महाराष्ट्र मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रिय असलेल्या या कलाप्रकारात मराठी लोकनाट्याच्या विकासासाठी लावणीचे मोठे योगदान असल्याचं कलावंत सांगतात. मात्र, मोबाईल आणि टीव्हीमुळे हा प्रकार धोक्यात आला आहे.
Surekha Punekar : ‘नाहीतर महिला स्टेजवर जाऊन मारतील’; ‘तो’ डान्स पाहून संतापल्या सुरेखा पुणेकर
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील शिवकन्या कचरे या वयाच्या पाचव्या वर्षापासून तमाशा या कला प्रकारांमध्ये काम करत आहेत. त्यांची ही पाचवी पिढी असल्याचं त्या सांगतात. तमाशा हा कलाप्रकार अतिशय सुंदर आहे. तमाशाने महाराष्ट्राचे आतापर्यंत प्रचंड मनोरंजन केले आहे. तमाशा म्हटलं तर पूर्वी प्रत्येक माणूस कलेचा आणि कलावंतांचा आदर करत होता. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून लावणी हा कलाप्रकार महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांवरती अधिराज्य गाजवत आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मानव प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा मानवाला ज्या पद्धतीने फायदा झालाय तेवढ्याच तोटा देखील झाला आहे. मानवाच्या हातामध्ये मोबाईल आणि टीव्ही आला. यामुळे त्याच्या आयुष्यात बदल होत आहे. मोबाईलचा प्रत्येक जण त्याच्या सोयीनुसार हवा तसा वापर करतो. मोबाईल मुळे प्रत्येक गोष्ट सहज मिळू लागली आहे. यामुळे अनेक जण अश्लीलता ही या मोबाईल वरती बघू लागले आहे. मोबाईल वरती आणि टीव्ही वरती सहज उपलब्ध होणाऱ्या या गोष्टी आता लावणी कलावंतांकडूनही प्रेक्षक अपेक्षित करत आहेत. ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बाब आहे, असं शिवकन्या कचरे म्हणतात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेली डान्सर गौतमी पाटील कोण आहे? पाहा Inside Story
पोटाची खळगी भरण्यासाठी कलाकार नाचतात या कलेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कित्येक ज्येष्ठ कलावंत पुरुष व महिला काम करत आहेत. तर काही तरुण मुली कलावंत आहेत. या प्रत्येकाला पोटाची खळगी भरायची आहे. म्हणून आम्ही तुमच्यासमोर कला सादर करतो. तुम्ही त्याच्याकडे अश्लील भावनेने बघून या कलेचा अपमान करत आहात, असं शिवकन्या कचरे सांगतात. चित्रपटांना कर्ज देता मग कलावंतांना का नाही? सरकार चित्रपटांसाठी कर्ज उपलब्ध करून देते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा तमाशा कलावंत सरकारच्या योजनांपासून वंचित आहे. कोरोना काळात आम्हाला कुठल्याही सुविधा मिळाल्या नाहीत. सरकारने घोषणा केल्या मात्र त्या आमच्यापर्यंत पोहोचल्याच नाही. त्यामुळे सरकारने ही कला टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असंही शिवकन्या कचरे म्हणतात.