JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : 400 वर्षांपासून कधीही पाणी न आटलेलं ठिकाण, पाहा कसा झाला चमत्कार, Video

Aurangabad : 400 वर्षांपासून कधीही पाणी न आटलेलं ठिकाण, पाहा कसा झाला चमत्कार, Video

panchakki in aurangabad : 400 वर्षांपूर्वीपासून या ठिकाणी कधीही पाणी आटलेलं नाही. 365 दिवस याठिकाणी झरे वाहतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 23 जानेवारी : औरंगाबाद जिल्ह्याला राज्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळखलं जातं.  औरंगाबाद  जिल्ह्यात एकापेक्षा एक पर्यटनस्थळे आहेत. यापैकीच एक म्हणजे पाणचक्की हे सुद्धा आहे. 400 वर्षांपूर्वीपासून या ठिकाणी कधीही पाणी आटलेलं नाही. 365 दिवस याठिकाणी झरे वाहतात. त्यामुळे पाणचक्की औरंगाबाद शहरातील एक मुख्य आकर्षण स्थळ असून देशी विदेशी पर्यटकाचे खास आकर्षण केंद्र आहे. जगातील अनेक पर्यटक येथे भेट देऊन याची कौशल्यपूर्ण रचना पाहून प्रभावित होतात. चला तर मग या पाणचक्कीची निमिर्ती कशी झाली जाणून घेऊया. कोणी बांधली पाणचक्की? औरंगाबाद आणि खुलताबाद ही भूमी सुफी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या यात्रेकरूंच्या भोजनाची सोय व्हावी यासाठी रशियामधील गझनवाद येथून आलेले हजरत बाबा शहा मुसाफिर यांनी पाणचक्की बांधली. या ठिकाणी सरया (धर्मशाळा) मशीद पाण्यासाठी भला मोठा हौद बांधण्यात आलेला आहे. बाबा शहा मुसाफिर यांच्याकडे येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या अधिक होती. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या यात्राकरुंसाठी जेवणासाठी लागणारे पीठ दळण्याची यंत्रणा असावी यासाठी पाण्यावरून पिठाची गिरणी चालवली जायची आणि त्या चक्कीत धान्य दळून त्याचे पीठ केले जायचे. त्यावरून पाण्यावर चालणारी चक्की म्हणजे पाणचक्की नाव पडले, असं पाणचक्की येथील गाईड अलीम भाई यांनी सांगितले.

कधी बांधण्यात आली पाणचक्की? ही पाणचक्की सन 1744 मध्ये बांधण्यात आली. औरंगाबाद शहराच्या उत्तरे कडेच म्हणजे सुमारे 6 किलोमीटर अंतरावर ती झटवाडा डोंगर आहे. या डोंगरातून जमिनीत जवळपास 30 फूट पर्यंत खोदकाम करून नहरीच्या माध्यमातून पाणचक्की तयार करण्यात आली. त्यानंतर पाणी 20 फूट उंचीच्या भिंतीवरून लोखंडी पंख्यावर सोडण्यात आले. पंख्यांच्या लोखंडी पाथ्यावर जोराने भिंतीवरून पडणारे पाणी पंख्यांना फिरायला भाग पाडते. त्याच्या वरच्या भागांमध्ये पंख्यांवरती एक दळण दळण्याचे जात बसवण्यात आले. त्या जात्यामध्ये धान्य टाकून त्यातून पीठ काढलं जायचं आणि यातून यात्राकरुंच्या जेवणाची व्यवस्था केली जात होती. सध्या या पाणचक्कीतून दळण दळले जात नसले तरी लोखंडी पंख आणि दगडी जाते आजही पाण्याच्या प्रवाहामुळे फिरते, असंही गाईड अलीम भाई यांनी सांगितले.

Aurangabad : कसं असेल देशातील सर्वात मोठे महेश भवन? पाहा Video

संबंधित बातम्या

त्यासोबतच या ठिकाणी एक मोठा हौद तयार करण्यात आलेला आहे. या हौदामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतं  आणि त्या हौदाच्या खाली एक मोठा हॉल तयार करण्यात आला आहे. त्याकाळी यात्रेकरूंना उन्हामध्ये गरम होऊ नये शांतपणे जेवण करता यावे. यासाठी वरती पाणी टाकले जायचं त्यानंतर खाली लोक जेवायचे. त्यामुळे या ठिकाणी थंडगार वातावरण असायचं अशा पद्धतीने डायनिंग हॉल या ठिकाणी तयार करण्यात आलेला होता. आजही तो डायनिंग हॉल सुस्थितीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या