अविनाश कानडजे औरंगाबाद, 12 डिसेंबर : औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यातच आता आणखी एक घटना समोर आली आहे. पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नीने सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड येथे कौटुंबिक वादातून माहेरी राहणाऱ्या विवाहितेने माहेरी पोहोचल्यानंतर पतीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध शुक्रवारी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक आव्हाना रोड येथे राहणाऱ्या एका सव्वीस वर्षीय विवाहित महिलेने सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीत तिने म्हटले आहे की, शेख फराज याच्याशी 25 मे 2017 रोजी तिचा विवाह झाला होता. बायजीपुरा औरंगाबादला मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न सोहळा पार पडला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. हेही वाचा - वर्षभरापूर्वी लग्न अन् पत्नीची आत्महत्या, बातमी ऐकताच पतीचा भयानक निर्णय, घटनेनं औरंगाबाद हादरलं या संदर्भात महिलेने त्यांच्याविरुद्ध मनमाड येथे कलम 498 अन्वये फिर्यादही दिली आहे. तेव्हापासून ती सिल्लोड येथे वडिलांच्या घरी राहू लागली. पीडितेचे बोलणे झाले तर 4 डिसेंबर रोजी ती घरी एकटीच होती, याच दरम्यान पती शेख फराज याने रात्री तिच्या माहेरच्या घरी पोहोचून तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवले. इतकेच नव्हे तर तिला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी पीडितेच्या पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक मदिराज करीत आहेत.