JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हिवाळ्यात खा आमरस, औरंगाबादमध्ये नोव्हेंबर महिन्यात मिळतोय आंबा! Video

हिवाळ्यात खा आमरस, औरंगाबादमध्ये नोव्हेंबर महिन्यात मिळतोय आंबा! Video

औरंगाबाद शहरातील शहानुर मिया दर्गा परिसरातील फळ विक्रेत्यांनी हंगाम बाह्य लालबागचा आंबा विक्रीसाठी आणला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 16 नोव्हेंबर : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आंबे खायला आवडत. मात्र, हे आंबे उन्हाळा ऋतूमध्येच बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतात. मात्र हे आंबे हिवाळामध्ये खायला मिळत असतीलतर नवलंच ना. पण होय  औरंगाबाद शहरातील शहानुर मिया दर्गा परिसरातील फळ विक्रेत्यांनी हंगाम बाह्य लालबागचा आंबा विक्रीसाठी आणला आहे. चवीला गोड आंबट तुरट असलेला हा आंबा ग्राहकांना भुरळ पाडत आहे. आंबा खायचा तर उन्हाळा आणि उन्हाळा असेल तर आंबा असे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून ठरलेलं. मात्र, औरंगाबाद शहरातील फळ विक्रेत्यांनी शहरातील ग्राहकांसाठी बंगरुळ येथून हंगाम बाह्य लालबाग जातीचा आंबा विक्रीसाठी आणला आहे. या हंगाम बाह्य लालबाग आंब्याला जुलै, ऑगस्टमध्ये मोहर लागतो. नोव्हेंबर ,डिसेंबर मध्ये ते काढून घेतले जातात. लालबाग आणि निरंजन जातीचे आंबे वर्षातून दोन वेळा येतात दिवाळीनंतर बिगर हंगामी आंबा उपलब्ध होतो, असं विक्रेत्यांनी सांगितले.

Video: शेतकऱ्यांनो, करू नका लहरी निसर्गाची काळजी, खेती ज्योतिष देणार सर्व माहिती!

आंब्याचे वैशिष्ट्य आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा दोनशे ग्रामचा आहे. चवीला गोड आंबट तुरट असा आंबा आहे. सध्या आंब्याच्ची आवक नसल्यामुळे आणि मागणी जास्त असल्यामुळे या आंब्याची किंमत तीनशे ते साडेतीनशे रुपये किलो प्रमाणे आहे. गुगल मॅपवरून साभार 

Wardha : पारंपारिक शेतीला फाटा देत रेशीमधून मिळवलं लाखोंच उत्पन्न, पाहा Video

संबंधित बातम्या

इथे करता येईल खरेदी तुम्हाला जर का हंगाम बाह्य आंब्याची चव चाखायची असेल तर तुम्ही शहानुर मीया दर्गा परिसरामध्ये असलेल्या फ्रुट विक्रेत्या स्टॉलवर जाऊन खरेदी करू शकता. रईस शेख या विक्रेत्याने आंबे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. हा आंबा तीनशे ते साडेतीनशे  रुपये किलो प्रमाणे आहे. संपर्क: 9552429342

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या