JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / त्यांच्या हातातला रिमोट गेल्यानं....; एकनाथ शिंदेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

त्यांच्या हातातला रिमोट गेल्यानं....; एकनाथ शिंदेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

आधी अजित दादा पवार टीका करत होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 12 सप्टेंबर : औरंगाबादच्या पैठणमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आणि रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी ही सभा आयोजित केली आहे, या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. काय म्हणाले एकनाथ शिंदे - आधी अजित दादा पवार टीका करत होते. आता सुप्रिया ताई सुळेपण करतात. पण टिका करणं त्याचं काम आहे आणि विकासाचं काम करणं आमचं काम आहे. या शब्दात एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. तसेच ते पुढे म्हणाले की, ताईंना मी सांगतो, हा एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत करतो. त्यात मी खंड पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. तुम्हाला चिंता का पडली आहे. कोण सरकार चालवत होतं, सर्वांना माहिती आहे. त्यांना पूर्वीची सवय आहे. मात्र, त्यांचा सगळा रिमोट काढून घेतल्याने त्यांना चिंता होत आहे, या शब्दात एकनाथ शिंदेंनी सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?  या सरकारच्या फक्त गाठीभेटी आणि गृह भेटी सोडून फारशा काही बातम्या दिसत नाहीत. तसेच त्यांचे जे दौरे दिसतात ते सुद्धा एक किलोमीटरच्या आतले असतात. ज्या ज्या वेळी मी टीव्ही बघते तेव्हा मला मुख्यमंत्री कुणाच्या तरी घरीच दिसतात, अशी टोमणाही सुप्रिया सुळे यांनी मांडला. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली होती. हेही वाचा -  मुंबई क्रिकेटमध्ये फडणवीस-पवार सामना, सिल्व्हर ओकवर निघालेले शेलार अचानक माघारी आता राज्यात कुठेही पालकमंत्री नाहीत. कोरोना असो किंवा नसो विरोधी पक्षनेते अजित पवार सकाळी 6 वाजेपासून काम करत असायचे. त्यांच्यासोबत सर्व प्रशासन काम करत होते. तसेच दर शुक्रवारी त्यांच्या मॅरेथॉन मिटिंग व्हायच्या. मात्र, आता पालकमंत्रीच नाहीत. म्हणून कामेही होताना दिसत नाहीत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या