औरंगाबाद, 02 डिसेंबर : मागच्या आठवड्यात शिंदे गटाचे आमदार गुवाहाटी येथे कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणवत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जातो. याच पार्वश्वभूमिवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील आमदार फुटू नयेत म्हणून या आमदारांना पुन्हा प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
एका उद्योगपतीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. भाजपचे त्रिवेदी महाराजांबद्दल बोलत असेल तर आम्हाला राग आला आहे. शिवसेना हळूहळू आक्रमकता दाखवेल आणि या सरकारला खाली खेचेल. हे खोके सरकार आहे. ते काहीही बरळत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
हे ही वाचा : सीमावादाचं लोण मराठवाड्यातही पोहोचलं; ‘या’मुळे नांदेडमधील 25 गावं तेलंगणात सामील होणार?
चंद्रकांत खैरे म्हणाले की, कृषिमंत्री केवळ आपल्या मर्जीतला कृषि आयुक्त कसा येईल, याकडे लक्ष देत आहेत. हे सरकार केवळ खोके घेण्यात व्यस्त आहे. मात्र, शेतकऱ्यांना काहीही मदत केली जात नाही. ऐन रब्बी हंगामात त्यांचे वीज कनेक्शन कट केले जात आहे.
गुलाबराव पाटलांचा पलटवार
ज्यावेळी महाराष्ट्रात सत्तांतर झालं, त्यावेळी आम्ही नवस मागितला होता. जेव्हा महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाचं सरकार येईल, तेव्हा आम्ही कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जाऊ त्यामुळे आम्ही सगळेजण कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गेलो.
हे ही वाचा : Eknath Shinde : अखेर जत तालुक्याला न्याय मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा
त्यामुळे जर कुणी म्हणत असेल की, आम्ही पाच कोटी घेतले, तर ते पाच कोटी मोजायला गेले होते का? असा माझा सवाल आहे. पण माणूस ज्या देवाकडे नवस करतो, तो नवस पूर्ण करण्यासाठी जात असतो, अशी आपली पद्धत आहे. असे गुलाबराव पाटील म्हणाले.