JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad: पक्षी निरीक्षणामध्ये आढळल्या 65 प्रजाती, पाहा कोणत्या विदेशी पाहुण्यांची हजेरी

Aurangabad: पक्षी निरीक्षणामध्ये आढळल्या 65 प्रजाती, पाहा कोणत्या विदेशी पाहुण्यांची हजेरी

सुखना नदीच्या पाणथळ्यावरती पक्षी निरीक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध प्रजातीचे तब्बल 65 पक्षी आढळून आले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 14 डिसेंबर : औरंगाबाद  जिल्ह्यातील पक्षी निरिक्षणासाठी सुखना नदी महत्वाची नदी म्हणून ओळखली जाते. याच सुखना नदीच्या पाणथळ्यावरती एन्व्हार्यन्मेंटल रिसर्च फॉउंडेशन अँड एज्युकेशनल अकॅडमितर्फे पक्षी निरीक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या पक्षी निरीक्षणामध्ये विविध प्रजातीचे तब्बल 65 पक्षी आढळून आले. यामध्ये विदेशी पक्षांचा समावेश होता. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नदी, नाले तुडुंब भरलेले आहेत. त्यातच दरवर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीला दिसून येणारे पक्षी यावर्षी उशिराने दिसून येत आहेत. त्यामुळे हिवाळ्यात दिसणारे देशी, विदेशी पक्षी बघण्यासाठी औरंगाबाद शहरातील एन्व्हार्यन्मेंटल रिसर्च फॉउंडेशन अँड एज्युकेशनल अकॅडमितर्फे सुखना नदीच्या पाणथळ्यावरती पक्ष निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या पक्षी निरीक्षणासाठी शहरातील विविध भागातील लहान-मोठे पक्षीप्रेमी मोठ्या उत्साहानेच पहाटे सहभागी झाले होते.

Aurangabad : प्रदर्शनातील मॉडेल तयार करण्यासाठी शेतकऱ्यावर म्हैस विकण्याची वेळ, Video

संबंधित बातम्या

यावेळी आढळून आले एकूण 65 वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी नकटे बदक , चक्रवाक, तरंग बदक, थापट्या बदक, तलवार बदक , भुवई बदक, चमचा , केंटीश चिखल्या  छोटा कंठेरी चिखल्या , पट्टेरी शेपटीचा पाणटिवळा , पाणलावा , कैकर , सामान्य गप्पिदास हे बाहेरून येणारे विदेशी पक्षी आढळून आले. तर तिरंदाज , मोठा पाणकावळा  खरूची, नदी सुरय  कुरव , दलदली भोवत्या हे देशांतर्गत स्थलांतर करणारे पक्षी आढळून आले. त्याचबरोबर पाणकावळे आणि राखी बगळे यांची घरटी देखील दिसून आली.  पक्षी निरीक्षण सातत्याने आयोजित करण्यात येणार  यंदा सुखना नदीच्या पाणथळ्यावरती पक्ष्यांसाठी चांगले पाणथळ तयार झाले आहे. पक्ष्यांसाठी पोषक वातावरण असल्याने मोठ्या संख्येने आणखी पक्षी येतील. त्यामुळे येत्या काळात सुखना नदीच्या पाणथळ्यावरती आणखी पक्षी बघायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्व निसर्गप्रेमींसाठी असे पक्षी निरीक्षण सातत्याने आयोजित करण्यात येणार आहे, असं पक्षी अभ्यासक कुणाल विभांडीक यांनी यावेळी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या