JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : औरंगाबादची बेस्ट पावभाजी, 25 वर्षांपासून कायम आहे चव! Video

Aurangabad : औरंगाबादची बेस्ट पावभाजी, 25 वर्षांपासून कायम आहे चव! Video

Best Pav Bhaji : औरंगाबादमध्ये गेल्या 25 वर्षांपासून ही बेस्ट पावभाजी आहे. इथं शहराच्या सर्व भागातील ग्राहकांची नेहमी गर्दी असते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 3 जानेवारी : रोजचं जेवायला किंवा घरी स्वयंपाक करण्यास कंटाळा आल्यावर चटकादार खाण्याचा पर्याय अनेक जण निवडतात. भेळ, पाणी पुरी, रगडा पॅटीस हे फास्ट फुड यामुळेच सर्वत्र लोकप्रिय झाले आहेत. यासोबतच पाव भाजी हा पदार्थ देखील सर्व वयोगटात चांगलाच फेमस आहे.  औरंगाबादकरांना पाव भाजी खाण्याची इच्छा झाली तर  शहरातील एका बेस्ट पावभाजीचा पर्याय आम्ही सांगणार आहोत. एकदा खाल तर पुन्हा याल औरंगाबाद शहरातील सिडको भागातील कैलास पावभाजी गेल्या 25 वर्षांपासून फेमस आहे. महागाईच्या काळात बहुतेक पदार्थांचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हौस करायला अडचण होते. त्यांची ही अडचण ओळखून राजस्थानच्या भागवतीलाल यांनी 25 वर्षांपूर्वी  पाणीपुरी सेंटर सुरू केलं. त्यांच्या पाणीपुरीची चव सर्वांना चांगलीच आवडली. सर्वांच्या आग्रहामुळेच त्यांनी पावभाजी सेंटर सुरू केले.  ही पावभाजी एकदा खाणारा त्याच्या प्रेमात पडतो. औरंगाबाद शहराच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण इथं पावभाजी खायला येतात. कैलास पावभाजी सेंटरमध्ये तुम्हाला स्पेशल पाव भाजी, मसाला पाव, खडी पावभाजी, बटर पाव, पुलाव, पाणीपुरी, रगडा हे पदार्थ खायला मिळतील. शहरातील सिडको भागामध्ये एन्ट्री एरियात कामगार चौकापासून 100 मीटर अंतरावरती कैलास पावभाजी सेंटर आहे. हे पावभाजी सेंटर दुपारी साडेबारा ते रात्री साडेदहापर्यंत सुरू असतं यामुळे या वेळेमध्ये तुम्ही चवदार पावभाजीचा आस्वाद घेऊ शकता. कोल्हापूरच्या ‘वर्ल्ड फेमस’ खांडोळीची कशी झाली सुरूवात?, पाहा Video गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी ग्राहकांच्या सेवे साठी पावभाजी सेंटर सुरू केलं.  पावभाजीची चव ग्राहकांना खूप आवडली आम्ही ही चव टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो.  महागाईच्या जमान्यांमध्ये सर्व साहित्य महाग मात्र आजही आम्ही दर्जेदार साहित्य वापरतो त्यामुळे आमची चव टिकून आहे, अशी प्रतिक्रिया या पावभाजी सेंटरचे मालक कैलास दायरी यांनी व्यक्त केलं.

औरंगाबाद शहरातील सर्वात स्पेशल पावभाजी इथं मिळते. गेल्या वीस वर्षांपासून आम्ही इथं नियमित येतो. वीस वर्षांपूर्वीची चव आजही कायम आहे. तुम्हाला पावभाजी खायची असेल तर इथं या. एकदा खाल्ल्यावर तुम्ही या पावभाजीच्या प्रेमात पडाल, अशी भावना येथील नियमित ग्राहक मंगेश कार्लेकर यांनी व्यक्त केली आहे.

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या