JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : News18 Local च्या बातमीचा दणका; BAMU मधील बंद कँटीन सुरु, पाहा VIDEO

Aurangabad : News18 Local च्या बातमीचा दणका; BAMU मधील बंद कँटीन सुरु, पाहा VIDEO

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लंच होम कँटीन (Lunch Home canteen) बंद होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 04 ऑगस्ट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मुबलक दरामध्ये अल्पोपहाराची सोय व्हावी या उद्देशाने विद्यापीठ प्रशासनाने मुख्य इमारतीच्या समोर लंच होम कँटीन  (Lunch Home canteen) उभारले. मात्र, लॉकडाऊन (lockdown) पासून हे लंच होम कँटीन बंद होते. विद्यापीठातील लंच होम  कँटीन बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. या संदर्भात News 18 Local ने बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाची लंच होम कँटीन सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी News 18 Local चे आभार व्यक्त केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठवाड्यासह विविध भागातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. विद्यापीठामध्ये एकूण 52 विभाग कार्यरत आहेत. यामध्ये हजारो विद्यार्थी व प्राध्यापक शिक्षण घेतात व शिक्षण देण्याचे काम करतात. यासोबतच मराठवाड्यातील विविध भागातील विद्यार्थी व शिक्षक हे कामकाजा निमित्त विद्यापीठामध्ये येत असतात. यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची विद्यापीठांमध्ये रेलचेल सुरू असते. यापैकी बहुतांशी विद्यार्थी हे मागास भागातील असतात. यामुळे या विद्यार्थ्यांची सोय व्हावी या उद्देशाने विद्यापीठ प्रशासनाने लंच होम कँटीन विद्यापीठात उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, लॉकडाऊन मध्ये प्रशासनाला लंच होम कँटीन बंद करावं लागलं. लॉकडाऊन उघडल्यानंतर विद्यापीठातील विभाग व कामकाज हळूहळू सुरू झालं. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठातील लंच होम कँटीन बंद होत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. या संदर्भात News 18 Local ने बातमी प्रकाशित केली होती त्यानंतर विद्यापीठातील कँटीन सुरु करण्यात आले आहे.

हेही वाचा :  आता घरबसल्या काढा Learning Driving License, Video पाहा आणि कामाला लागा!

संबंधित बातम्या

गैरसोय टळली विद्यापीठात मराठवाड्यातील विविध भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. वस्तीगृहात राहून ते अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत असतात. मात्र त्यांना जेवणासाठी व्यवस्था नव्हती. पावसामध्ये त्यांना जमिनीवर बसून जेवण करावं लागत होते. विद्यापीठातील लंच होम कँटीन सुरू झाल्यामुळे त्यांची ही गैरसोय टळली आहे. यासाठी  News News 18 Local ने बातमी केल्यामुळे आमची गैरसोय टळली, अशी प्रतिकिया अमोल डोळस या विद्यार्थ्याने दिली आहे. विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांची नाश्तापाण्याची सोय व्हावी यासाठी विद्यापीठामध्ये लंच होम कँटीन सुरू करण्यात आली. मात्र, लंच होम कँटीन ही लॉकडाऊन पासून बंद होती. आताही कँटीन सुरू झाल्यामुळे आमची खाण्यापिण्याची सोय होत आहे. यासाठी News 18 Loca ने दखल घेतल्याबद्दल News 18 Local चे आभार, अशी प्रतिकिया मानसी श्रीवास्तव या विद्यार्थिनीने दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या