JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : वडिलांनी मारल्याने अल्पवयीन मुलगी गेली प्रियकराच्या घरी, प्रियकराच्या कुटुंबीयांनी केलं भलतचं

Aurangabad : वडिलांनी मारल्याने अल्पवयीन मुलगी गेली प्रियकराच्या घरी, प्रियकराच्या कुटुंबीयांनी केलं भलतचं

14 वर्षीय मुलगी घरसोडून आपल्या प्रियकराकडे वडील मारहाण करतात म्हणून चौदा वर्षीय मुलीने चक्क प्रियकराचे घर गाठून त्याला लग्नाची गळ घातली. (Aurangabad)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 22 सप्टेंबर : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 14 वर्षीय मुलगी घरसोडून आपल्या प्रियकराकडे वडील मारहाण करतात म्हणून चौदा वर्षीय मुलीने चक्क प्रियकराचे घर गाठून त्याला लग्नाची गळ घातली. (Aurangabad) परंतु इकडे तिचे आई- वडील ठाण्यात गेल्याचे समजताच प्रियकराच्या कुटुंबीयांनी तिला पोलिसांसमोर हजर केले. त्यानंतरही मुलगी वडिलांच्या घरी गेली नाही. तिने बालसुधारगृहात जाण्याचा मार्ग स्वीकारला. मुकुंदवाडीत 21 सप्टेंबरला हा प्रकार समोर आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकुंदवाडी हद्दीत रिक्षाचालक पत्नीसह मुलगा व १४ वर्षांच्या मुलीसह राहतात. त्यांची मुलगी आशा (नाव बदलले आहे) दहावीत आहे. तिने रामनगरमध्ये शिकवणी लावली होती. तेथील वैशाली नामक महिलेसोबत तिची ओळख झाली. शिकवणी संपल्यावर ती वैशालीकडे जायची. तेथे तिचा मावस • दीर उमेश कळसकरसोबत आशाची ओळख झाली.

हे ही वाचा :  पंचतत्वात विलीन झाले राजू श्रीवास्तव, लोकांनी लावला ‘अमर रहे’चा नारा

संबंधित बातम्या

सहा महिन्यांपूर्वी उमेशने तिला फूस लावून पळविले होते. मात्र, आशाचे आई-वडील ठाण्यात येताच लता कळसकर, करण हरेर, उमेश कळसकर, दिशा गज, अश्विनी जाधव, वैशाली झिने यांनी आशाला ठाण्यात आणून सोडले. तेव्हा तिने स्वतःहून घर सोडल्याचे सांगून पुन्हा जाणार नसल्याचे कबूल केले. 15 सप्टेंबरला ती पुन्हा गायब झाली. तेव्हा आशाच्या मैत्रिणीने तिच्या घरी फोन करून ती सोबत असल्याचे कळविले.

जाहिरात

18 सप्टेंबरला आशा पुन्हा गायब झाली. त्यामुळे तिचे आई-वडील मुकुंदवाडी ठाण्यात गेले. ही माहिती कळताच उमेश कळसकर, त्याची आई लता, करण हरेर, करणची बहीण हे आशाला घेऊन मुकुंदवाडी ठाण्यात आले. तेथे पोलिसांनी आशाकडे विचारपूस केली असता वडील मारहाण करीत असल्याने ती लग्न करण्याच्या उद्देशाने उमेशच्या घरी गेल्याचे तिने सांगितले.

हे ही वाचा :  वादाचं रुपांतर भयानक घटनेत; पुण्यात पत्नीची हत्या करुन पतीनेही उचललं टोकाचं पाऊल

जाहिरात

तसेच वडिलांच्या घरी जाण्यास नकार दिला. त्यामुळे तिला पोलिसांनी बालसुधारगृहात ठेवले. या प्रकरणी आशाच्या आईच्या तक्रारीवरून उमेश याच्यासह आई-वडील आणि इतरांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या