JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Agniveer Recruitment Aurangabad : 10 ची बॉटल 30 रुपयांना, पावसाळ्यात भावी 'अग्नीवीर' सैनिक रस्त्यावरच झोपले!

Agniveer Recruitment Aurangabad : 10 ची बॉटल 30 रुपयांना, पावसाळ्यात भावी 'अग्नीवीर' सैनिक रस्त्यावरच झोपले!

अग्नीवीर भरतीसाठी औरंगाबाद शहरांमध्ये आलेल्या तरुणांचे अतोनात हाल सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 17 ऑगस्ट : अग्नीवीर भरतीसाठी औरंगाबाद शहरांमध्ये आलेल्या तरुणांचे अतोनात हाल सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. (Agniveer Recruitment Aurangabad) औरंगाबाद शहरातल्या विद्यापीठाच्या मैदानावर अग्नीवीरांची भरती सुरू आहे. यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून तरुणांची अलोट गर्दी लोटली आहे. मात्र या तरुणांना ना राहण्याची, ना खाण्याची, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. तर मुलांना 10 रुपयांची पाण्याची बॉटल 30 रुपयाला घ्यावी लागली. त्यामुळे रस्त्यावरती मिळेल तिथे हे तरुण झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे भावी जवानांचे कसे हाल सुरू आहेत ही परिस्थिती समोर आली आहे.

तर भविष्यात देश ज्यांच्या हातात सुरक्षित राहणार आहे अशा तरुणांना रात्रभर रोडवर झोपून न पाणी पिता आणि न काही खाता रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे.

हे ही वाचा :  Aurangabad : वाल्याचा झाला वाल्मिकी! एकेकाळचा गुन्हेगार आता बनला शेतकरी, पाहा कसा झाला बदल VIDEO

संबंधित बातम्या

भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये पुरुष उमेदवारांसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेत  सैन्य दलाला जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती मदत केली जात आहे. सैन्य दलाच्या अग्नीवीर भरती प्रक्रियानुसार विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ या दहा जिल्ह्यांमध्ये सैन्य दलातील काही पदांची भरती सुरू करण्यात आली आहे.

दहावी व आठवी पास पात्रता असणाऱ्या या पदांसाठी ऑनलाइन नोंदणी तीन ऑगस्ट  (आज) पर्यंत सुरू राहणार आहे. तरुणांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी जॉईनइंडियनआर्मी डॉट एनआयसी डॉट इन (joinindianarmy.nic.in) या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. पात्र उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडीवर प्रवेश पत्र 10 ते 20 ऑगस्ट दरम्यान मिळणार आहे.  

जाहिरात

हे ही वाचा :  Maharashtra Assembly Monsoon Session : विधानभवनात शिंदे गटाची माघार, सेनेचं कार्यालय सोडलं; व्हिपवरून मात्र जुंपली

ईमेलवर प्रवेश पत्र पाठविल्यानंतर 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत भारतीय रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय सैन्य दलात सेवा करण्यास इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सैन्यदलामार्फत करण्यात आले आहे. आतापर्यंत हजारोंच्या संख्येत तरुणांनी अर्ज सादर केले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या