JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाकरे-सत्तार संघर्ष वाढणार, आदित्य ठाकरेंची तोफ सत्तारांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार!

ठाकरे-सत्तार संघर्ष वाढणार, आदित्य ठाकरेंची तोफ सत्तारांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार!

कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यातला संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 नोव्हेंबर : कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यातला संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण आदित्य ठाकरे अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ असलेल्या सिल्लोडमध्ये सभा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून अब्दुल सत्तार आदित्य ठाकरेंवर टीका करत आहेत, यानंतर आता आदित्य ठाकरे थेट सत्तारांच्या बालेकिल्ल्यात जाणार आहेत. आदित्य ठाकरे 7 नोव्हेंबरला बुलढाणा आणि सिल्लोडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यात सिल्लोडमध्ये त्यांची सभा होणार आहे. याशिवाय ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. बेळगाव सीमाप्रश्न पंतप्रधान मोदी सोडवणार? महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये मोठी घडामोड अब्दुल सत्तारांचं आदित्यना आव्हान अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर मी बुधवारपर्यंत राजीनामा देऊ शकतो. मात्र मी राजीनामा दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील सिल्लोडमधून निवडणूक लढवून दाखवण्याची हिम्मत करावी असे अब्दुल सत्तार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी देताच मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. पण, चंद्रकांत खैरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून सिल्लोडमधून विजयी होऊन दाखवावे, असं चॅलेंज अब्दुल सत्तार यांनी दिलं. शिवारात राबणारा मुख्यमंत्री! राजकारणातून ब्रेक घेत शिंदे रमले शेतात, Video

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या