औरंगाबाद, 17 डिसेंबर : शहरामध्ये गुटखा विक्री बंदी असतानाही गुटख्याची सरास विक्री होत आहे. यामुळे गुटखा खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गुटखा खाल्ल्यामुळे कर्करोगासारखा आजार होतो. मात्र असं असतानाही गुटखा खाल्ला जात आहे. शहरातील समुपदेशन केंद्रामध्ये एप्रिल पासून आलेल्या 5 हजार नागरिकांपैकी 75 जणांना गुटखा खाल्यामुळे तोंडच उघडता येत नसल्याची माहिती घाटी रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पद्मजा सराफ यांनी दिली आहे. तंबाखू, पानमसाला यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे अलीकडे नागरिकांना तोंडाच्या कर्करोगासारखे मोठे आजार बघायला मिळत आहेत. गुटखा सेवन केल्यामुळे तोंडात पांढरे किंवा लाल ठिपके पडणे, जीभ ओठ किंवा तोंडावर फोड येणे, तोंडातून रक्त येणे तोंडाच्या भागात सूज येणे याचे प्रमाण दिसून येत आहे. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालया तर्फे एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 5 हजार नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले. यापैकी 75 जणांचे तोंडच उघडत नसल्याचे माहिती समोर आली आहे. यामुळे या नागरिकांना जेवण करणे कठीण जात आहे.
Aurangabad : काळजीची बातमी! जिल्ह्यात वाढली HIV रुग्णांची संख्या, Video
गुटखा सोडण्यासाठी काय करावं?
अनेकांना गुटखा जन्य पदार्थ सोडण्याची इच्छा असते. मात्र ते कशी सोडावी असा प्रश्न असतो. यासाठी नागरिकांनी गुटखा खाणाऱ्या नागरिकांची साथ सोडावी. गुटखा खायची इच्छा झाल्यास शंभरच्या उलट मोजणी करावी. सोबत शेंगदाणे मनुके इत्यादी पदार्थ ठेवावे. यासोबतच तुम्ही लवंग, इलायची देखील सोबत ठेवू शकता या गोष्टी केल्या तर तुम्ही गुटखा खाण्यापासून नियंत्रण मिळू शकतात. नागरिकांनी गुटखा जन्य पदार्थ खाऊन रोगाला आमंत्रण देऊ नये. असे पदार्थ खाणं टाळावं काही समस्या असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावे. डॉक्टरांचा तात्काळ सल्ला घेऊन उपचार केल्यास भविष्यातील धोके टाळता येऊ शकतात, असंही पद्मजा सराफ यांनी सांगितलं.