औरंगाबाद, 05 फेब्रुवारी : हिंगणघाट इथं झालेल्या प्राध्यपिका जळीत प्रकरणातील पीडित मृत्यूशी झुंज देत आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला पेटवण्यात आलं होतं. 95 टक्के भाजलेल्या या महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात ही घटना घडली होती. आरोपी संतोष मोहितेने घरात घुसून 50 वर्षीय पीडित महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिलं होतं. यामध्ये पीडित महिला 95 टक्के गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होती. मात्र, संध्याकाळी या महिलेनं अखेरचा श्वास घेतला. काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गावात राहणारा आहे. संतोष मोहिते असं आरोपीचं नाव आहे. आरोपी संतोष मोहिते हा गावात बिअर बार चालवतो. आरोपी पीडितेच्या घरी गेला आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती. परंतु, पीडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने तिला रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आरोपी संतोष मोहिते पोलिसांच्या अटकेत आहे. दरम्यान, दुसरकडे वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये प्राध्यपिका जळीत प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेत ती प्राध्यापिका 40 टक्के होरपळली असून तिच्यावर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्या पीडित शिक्षिकेची प्रकृती जैसे थे - डॉ.अनुप मराल दरम्यान, पीडित तरुणीच्या प्रकृतीबद्दल आरेंज सिटी हॉस्पिटलचे डॉ. अनुप मराल यांनी मेडिकल बुलेटिन जाहीर केलं. पीडित तरुणीची प्रकृती जैसे थे आहे. पण ती उपचाराला प्रतिसाद देत असून तिच्या तब्बेतील सुधारणा नाही. युवती डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असून ती बोलण्याचा देखील प्रयत्न करत आहे. तज्ञ डॉक्टर आणि राजकीय नेत्यांनी रुग्णालयात येऊन युवतीच्या तब्बेतीची विचारपूस केली आहे. सरकारतर्फे ४ लाख रुपयांचा ऍडव्हान्स रुग्णालयाला मिळाला आहे. राज्य सरकार युवतीच्या तब्येती बाबत संपर्कात आहे.